घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८ हजार अधिकाऱ्यांना सातवा वेतन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८ हजार अधिकाऱ्यांना सातवा वेतन

Subscribe

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सुमारे ७ हजार ९५५ कर्मचारी अधिकाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार असून अप्रत्यक्ष म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेली पिंपरी-चिंचवड ही पहिली महानगरपालिका ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे हा निर्णय त्वरित झाला असून याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जात असल्याचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

- Advertisement -

अखेर निर्णयावर शिक्कामोर्तब

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्याला पाच वर्षात केवळ आश्‍वासनाची गाजरे वाटली. कोणताही प्रमुख निर्णय त्यांना घेता आला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने सातवा वेतन आयोग करिता सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, माझ्याकडून त्यांना पदरी निराशाच मिळाली दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वप्रथम सातवे वेतन आयोग लागू तात्काळ होणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यांनी तो शब्द खरा करून दाखवला. नुकत्याच नागपूर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. हा निर्णय केवळ अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे तात्काळ झाला आहे. इतर कोणी काही म्हणत असेल तरी त्याचे श्रेय केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला जात असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले आहे.


हेही वाचा – अ‍ॅक्सिस बँकेतील पगार लवकरच राष्ट्रीयीकृत बँकेकडे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -