घरमुंबईकल्याण - डोंबिवली लोकल उद्या ५ तास बंद

कल्याण – डोंबिवली लोकल उद्या ५ तास बंद

Subscribe

- मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम २५ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान लोकल बंद राहणार आहे.

मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम येत्या २५ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान ‘अप’ व ‘डाऊन’ जलद आणि धीमा मार्ग; तसेच पाचव्या – सहाव्या मार्गांवर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

१६ मेल – एक्स्प्रेस रद्द

दरम्यान, ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे ४०० मेट्रिक टन वजनाचे, सहा मीटर रुंदीचे चार गर्डर बसवण्याचे काम बुधवारी सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत हाती घेण्यात येईल. त्यामुळे कल्याण – डोंबिवली स्थानकादरम्यानची रेल्वे वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार आहे. विशेष म्हणजे एकूण १६ मेल – एक्स्प्रेस रद्द केल्या जणार आहेत. परिणामी नाताळासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisement -

लोकल सेवेवर परिणाम

कल्याण – डोंबिवली दरम्यान सकाळी ९.१५ ते दुपारी १.४५ वेळेत लोकल वाहतूक बंद
दर २० मिनिटांनी कल्याण – कर्जत / कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या
दर १५ मिनिटांनी डोंबिवली / ठाणे – सीएसएमटी विशेष फेऱ्या
सीएसएमटी – दादर, कुर्ला, ठाणे फेऱ्या वेळापत्रकानुसार

दिवा – पनवेल – कर्जत मार्गे

(१६३३९) सीएसएमटी – नागरकोईल एक्स्प्रेस
(११०११) एलटीटी – नांदेड एक्स्प्रेस
(१७०३१) हैदराबाद – सीएसएमटी एक्स्प्रेस

- Advertisement -

हेही वाचा – बोगस संस्थेच्या मान्यतेसाठी विद्यार्थी संघटनेचा दबाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -