घरठाणेशहापूर दुर्घटना : सखोल चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

शहापूर दुर्घटना : सखोल चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Subscribe

मुंबई : समृद्धी महामार्गावर (Samrudhi superfast Express) शहापूरजवळ (Shahapur) पुलाचे काम सुरू असताना गर्डरसह क्रेन कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना दुर्दैवी असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी दिले आहेत. मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणांही त्यांनी यावेळी केली.

शहापूर मार्गावर सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामात पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला. यामध्ये अद्यापही काही जण दबलेले असून, त्यासाठी बचाव कार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घटनास्थळी एनडीआरएफची टीम (Ndrf Team) दाखल झाली असून, गर्डरखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या डॉग स्कॉटच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाऱ्याखाली सर्च ऑपरेशन सुरू आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. यात सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास शहापूरजवळील सरलांबे गावाच्या हद्दीत क्रेनच्या मदतीने गर्डर पुलावर बसवण्याचे काम सुरू होते. पण गर्डरसह क्रेन कोसळल्याने मोठा अपघात झाला. त्यावेळी 16 कामगार आणि 9 अभियंते असे एकूण 26 ते 27 लोक काम करत होते. या अपघातता 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 2 ते 3 जणांना रेस्क्यु करण्यात आले आहे. या अपघातातील जखमींना शहापूर तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पण 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

असा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. आतापर्यंत 17 मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख

शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisement -

बचावकार्य युद्ध पातळीवर-अजित पवार

शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, असे ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -