घरमहाराष्ट्रभुजबळांचे नाव न घेता शरद पवारांनी साधला निशाणा; म्हणाले...

भुजबळांचे नाव न घेता शरद पवारांनी साधला निशाणा; म्हणाले…

Subscribe

आज झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला शरद पवार यांच्या गटातून खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले. पण शरद पवार यांनी सुद्धा भुजबळांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

मुंबई : छगन भुजबळ यांचे नाव हे शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक नाव. पण याच शरद पवारांच्या विरोधात जात छगन भुजबळ यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आणि रविवारी (ता. 02 जुलै) दुसऱ्या क्रमांकावर येत शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. आज झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला शरद पवार यांच्या गटातून खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले. पण शरद पवार यांनी सुद्धा भुजबळांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. (Sharad Pawar hit the mark without taking Chhagan Bhujbal name)

हेही वाचा – भ्रष्ट वाटणाऱ्या राष्ट्रवादीला सोबत का घेतलं? शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisement -

यावेळी भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले की, काही लोकांनी भाषणं केली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारीला लोक जातात. उन्हातान्हातून, दगड-धोंड्यातून जातात. अंतकर्णात एकच भावना असते, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. पंढरपूरला पोहचल्यानंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही. बाहेरून कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने पुढे जातात. त्यामुळे विठ्ठल, गुरू म्हणायचे आणि आमच्याकडं दुर्लक्ष झालं, असं सांगायचं. मोठी गंमतीची गोष्ट आहे, असे म्हणत पवारांनी भुजबळांवर टीका केली.

तर, यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगातून आल्यानंतर मंत्री कसे केले याबाबत देखील माहिती दिली. मला आठवतं, असेच एक नेते तुंरुगात गेले. काही महिन्यानंतर त्यांची सुटका झाली. निवडणुका आल्यावर लोकांनी सांगितलं, खटल्याचा निकाल लागेपर्यंत संधी देऊ नका. पण, त्यांच्यावर अन्याय होत, तुरुंगात बसावं लागले. अशावेळी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना एकटं पडू देणार नाही. माझा पक्ष त्यांच्या पाठीमागे असेल. पुन्हा तिकीट दिलं, सरकार आलं. तेव्हा शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधीवेळी पहिलं नाव त्यांचं दिलं, अशी माहिती शरद पवारांकडून देण्यात आली.

- Advertisement -

रविवारी शपथविधी होण्याआधी छगन भुजबळ यांनी शरद पवारांशी फोनवरून संपर्क साधला होता. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी सकाळी मला फोन आला. मला विचारलं कायं चाललं. मी म्हटलं, मलाही माहिती नाही, कायं चाललं आहे. ते म्हणाले, ठिकंय मी जातो, बोलतो आणि कळवतो. नंतर तीन वाजता पाहिलं, तर शपथ घेतली. त्यामुळे इथून पुढे बघून घेतो, सांगितलं, तर जरा जपून, असा खोचक टोला पवारांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -