घरमहाराष्ट्रSharad Pawar Letter : दूध आंदोलनात शरद पवारांची एंट्री, मुख्यमंत्र्यांना लिहिले आवाहन करणारे पत्र

Sharad Pawar Letter : दूध आंदोलनात शरद पवारांची एंट्री, मुख्यमंत्र्यांना लिहिले आवाहन करणारे पत्र

Subscribe

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला 34 रुपये प्रतिलिटर दूध दर देण्याबाबत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 21 नोव्हेंबर रोजी बोलविलेली बैठक अनिर्णित ठरली.

मुंबई : राज्यात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दूध संघ दूध खरेदीत आदेशाचे पालन करत नसल्याचे निर्देशनास आणण्याचे पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. (Sharad Pawar Letter Sharad Pawars entry in the milk movement a letter appealing to the Chief Minister)

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला 34 रुपये प्रतिलिटर दूध दर देण्याबाबत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 21 नोव्हेंबर रोजी बोलविलेली बैठक अनिर्णित ठरली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने 24 नोव्हेंबरला सर्व दूध संकलन केंद्रांवर शासन आदेशाची होळी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्यातील दूध उत्पादकांना किमान दर प्रतिलिटर 34 रुपये असा दर जाहीर केला आहे. मात्र, दरात रिव्हर्स दराची तरतूद केल्यानंतर हा दर विविध दूध संघांकडून 34 ऐवजी 27 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दूध संघांच्या तसेच कंपन्यांच्या मनमानीला चाप बसवावा, अशी मागणी करत किसान सभेने याबाबत दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन देत आंदोलनांची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध दराच्या प्रश्नावर बैठक घेतली होती. मात्र ती अयशस्वी ठरली.

- Advertisement -

शरद पवारांनी लिहिले आवाहन करणारे पत्र

याप्रकरणी किसान सभेचे डॉ. अजित नवले व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले असून, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या सगळ्यांचा आढावा घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : GOGAWALE VS DANVE : …तर दानवेंना संभाजीनगर आणि रायगडमधील फरक दाखवून देऊ; शिंदे गटाचा थेट इशारा

काय आहे शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रात?

मुख्यमंत्र्यांना आवाहन करणाऱ्या पत्रात शरद पवारांनी लिहिले की, गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2023 रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान 34 रुपये प्रति लिटर निश्चित करूनही या आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. व त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे असे आवाहन शरद पवार यांनी त्यांच्या पत्रातून केले आहे.

हेही वाचा : PHOTO : मुख्यमंत्री Eknath Shinde तेलंगणात; BJP उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅली-रोड शो

उपोषण मागे घेण्याची केली विनंती

याच पत्रात शरद पवार यांनी उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -