घरताज्या घडामोडीKoregaon Bhima Violence: शरद पवारांना चौकशी आयोगाचा समन्स, कोरेगाव-भीमा प्रकरणी आज देणार...

Koregaon Bhima Violence: शरद पवारांना चौकशी आयोगाचा समन्स, कोरेगाव-भीमा प्रकरणी आज देणार साक्ष

Subscribe

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज साक्ष नोंदवणार आहेत. या प्रकरणी शरद पवारांना तिसरं समन्स मिळालं असून आज मुंबईत सुनावणी होणार आहे. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे.एन.पटेल आयोगासमोर शरद पवार साक्ष देणार आहेत.

शरद पवारांना आयोगाकडून ५ मे आणि ६ मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी त्यांना तिसरं समन्स देण्यात आलं आहे. त्यानुसार आज ते चौकशीला हजर राहणार आहेत. २७ एप्रिल रोजी शरद पवारांना आयोगापुढे चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर ५ आणि ६ मे रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी पवारांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज पवार जे.एन.पटेल आयोगासमोर साक्ष देणार आहेत.

- Advertisement -

यापूर्वीही त्यांना समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते. २३ आणि २४ फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्याकरिता आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही कारणांमुळे ते साक्ष देण्यासाठी हजर राहू शकले नव्हते.

पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे.

- Advertisement -

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. याप्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं म्हटलं होतं. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या हिंसाचाराला जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. त्यामुळे अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाकडून शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आले.


हेही वाचा : शरद पवारांना भीमा कोरेगाव आयोगापुढे चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -