घरमहाराष्ट्रशिंदे गटाचा सावध पवित्रा! ‘वर्षा’ बंगल्यावर दिवसभर बैठक सत्र, कायदेतज्ज्ञ, जाणकारांसोबत मंथन

शिंदे गटाचा सावध पवित्रा! ‘वर्षा’ बंगल्यावर दिवसभर बैठक सत्र, कायदेतज्ज्ञ, जाणकारांसोबत मंथन

Subscribe

मुंबई । धनुष्यबाणाचे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठविण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे.

शनिवारी निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर रविवारी उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. रविवारी ते याबाबत आपल्या भावना सर्वांसमोर जाहीर करतील अशी आशा सर्वांना होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. कायदेतज्ज्ञ, राजकीय जाणकार, मंत्री, नेते आणि पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करत याबाबत त्यांनी मंथन केल्याचे समजते. ‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जर वापरता येत नसेल, तर मग यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध असतील, याचा आढावा त्यांनी या बैठकांद्वारे घेतल्याचे समजते. कायदेतज्ज्ञ, राजकीय जाणकार, मंत्री नेते आणि पदाधिकारी यांच्या सल्ल्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आहे.

- Advertisement -

नाव आणि चिन्ह याबद्दलची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे उद्याच्या दिवसाचा अवधी आहे. त्यामुळे सोमवारी शिंदे गटाकडून नाव आणि चिन्हाबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -