घरताज्या घडामोडीसाई भक्तांसाठी खुशखबर! आता 'या' वेळेत घेता येणार शिर्डीच्या साईबाबांचे मुख दर्शन

साई भक्तांसाठी खुशखबर! आता ‘या’ वेळेत घेता येणार शिर्डीच्या साईबाबांचे मुख दर्शन

Subscribe

१६ डिसेंबरपासून सकाळी ६:३० ते रात्री ९: ३० पर्यंत भाविकांना साईबाबांचे मुखदर्शन घेण्याची व्यवस्था

राज्यातील तमाम साई भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहे. कारण शिर्डीच्या साईबाबांचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीच्या साई मंदिरात मुखदर्शन सुरू करावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीचा विचार करुन त्याचप्रमाणे नाताळ आणि नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन येत्या १६ डिसेंबरपासून भाविकांना साईबाबांचे मुखदर्शन देण्यास संस्थानेन परवानगी दिली आहे.
साई मंदिरात रोज होणाऱ्या आरतीच्या वेळे व्यतिरिक्त १६ डिसेंबरपासून सकाळी ६:३० ते रात्री ९: ३० पर्यंत भाविकांना साईबाबांचे मुखदर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.


भाग्यश्री बानायत यांनी यावेळी म्हटले आहे की, राज्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ५ एप्रिलपासून साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर ७ ऑक्टोबरपासून अटीशर्तीच्या आधारे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांना ऑनलाईन पासेसद्वारे दर्शनसाठी व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून ऑफलाईन पासेस देखील देण्यात आले. ऑफलाईन पासेसच्या माध्यमातून दरररोज प्रति तास ११५० भाविकांना दर्शन देण्यात येत होते मात्र गर्दीच्या वेळी अनेक भविकांना पास मिळत नसल्याने त्यांच्याकडून साईंच्या मुखदर्शनाची मागणी करण्यात येत होती. भाविकांच्या या मागणीचा योग्य विचार करुन संस्थानाने साईंचे मुखदर्शन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

शिर्डीच्या साई मंदिरात १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणाऱ्या मुखदर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा. मात्र दर्शनाला येताना कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन बानायत यांनी केले आहे.


हेही वाचा – Kashi Vishwanath corridor: तब्बल २८६ वर्षानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण, शेकडो वर्षांचा इतिहास

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -