घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगतची दारू भट्टी उद्ध्वस्त

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगतची दारू भट्टी उद्ध्वस्त

Subscribe

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत असलेली दारू भट्टी शिरगाव पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत असलेल्या बेकायदा दारू भट्टी शिरगाव पोलिसांनी उध्वस्त केली आहे. यात तब्बल ११ लाख ५५ हजार रुपयांची २३ हजार लिटर दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त केले गेले आहे. यातील संबंधित राहुल नानावत हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध शिरगाव पोलीस घेत आहेत. दरम्यान, आता पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे शिरगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांचे कौतुक होत आहे.

पोलीस येण्याची माहिती मिळाल्यामुळे आरोपी फरार

दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळेच शिरगाव पोलिसांनी बेकायदा हात भट्टी दारू बनवणाऱ्यावर कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत हजारो लिटर दारू बनवली जात आहे. माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार म्हसवडे हे त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी गेले. पोलीस येणार असल्याची कुणकुण तेथील व्यक्तींना मिळाल्याने ते तेथून पळून गेले.

- Advertisement -

नक्की वाचा अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन वर्षाचा कारावास

रसायनाचे चार बॅलर पोलिसांनी केले उद्ध्वस्त

दरम्यान, संबंधित ठिकाणी तब्बल २३ हजार लिटर हात भट्टी तयार करण्याचे रसायन चार बॅलर पोलिसांनी उद्ध्वस्त करत नष्ट केले आहे. यामुळे शिरगाव पोलीस हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. संबंधित परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस किशोर म्हसवडे, पोलीस कर्मचारी राकेश पालांडे, पोपट कांबळे, दिलीप बोरकर, महादेव कवडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -