घरमुंबईआरे आंदोलन : २९ जणांना जामीन मंजूर, बोरिवली कोर्टाचा निर्णय

आरे आंदोलन : २९ जणांना जामीन मंजूर, बोरिवली कोर्टाचा निर्णय

Subscribe

आरे वृक्ष तोडविरोधात आंदोलन करणार्‍या २९ जणांची बोरिवली कोर्टाने सात हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली आहे.

आरे वृक्ष तोडविरोधात आंदोलन करणार्‍या २९ जणांना बोरिवली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरे कॉलनी मेट्रो ३ कारशेडसाठी शुक्रवारी झाडे तोडली गेली. त्याच्याविरोधात आंदोलन करणार्‍या २९ जणांना अटक केली होती. त्या सर्वांना कोर्टाकडून रविवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून त्यास विरोध करणार्‍या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून पोलिसांनी २९ जणांना अटक केली होती. या आंदोलकांची सात हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

कुटुंबियांची पत्रकार परिषद

- Advertisement -

मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करताना अटक झालेल्या २९ जणांच्या कुटुंबियांनी रविवारी गोरेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने २३ पुरूष आणि ६ महिलांना अटक केल्याचा आरोप करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांसह स्थानिक आदिवासींचाही समावेश होता.

जमावबंदी तोडली

आरे येथील वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवत आरे बचाव आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाविरुद्ध पर्यावरणप्रेमींनी हा लढा उभा केला. एका रात्रीत ४०० पेक्षा जास्त झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांचा संताप उफाळून आला होता. दरम्यान, शनिवारी २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या सगळ्यांना बोरीवली न्यायालयापुढे हजरही करण्यात आले. त्यानंतर सगळ्या आंदोलकांना बोरीवली कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टात सुनावणी

आरेमधील झाडे तोडण्याविरोधात आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी घेतली असून सोमवारी तातडीने आरेबाबत सुनावणी ठेवली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतली जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – आरेतील झाडांच्या खुन्यांना सत्तेत आल्यानंतर बघू – उद्धव ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -