घरमुंबईधावत्या एक्स्प्रेसमधून बाटली भिरकावल्याने रेल्वे कर्मचारी जखमी

धावत्या एक्स्प्रेसमधून बाटली भिरकावल्याने रेल्वे कर्मचारी जखमी

Subscribe

मध्य रेल्वेच्या मार्गावर एक्स्प्रेसमधून भिरकवलेल्या बाटलीमुळे रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने एक तरूण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एक्स्प्रेसमधून फेकलेल्या बाटलीमुळे रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील पारसिक बोगद्यााजवळ मांडवी एक्स्प्रेसमधून फेकलेल्या बाटलीमुळे रूळांवर काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रूळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांची संघटना अशा घटनाविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.

नेमके काय घडले?

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील कळवा पारसिक बोगद्यााजवळ संपत बाबड हे कर्मचारी गुरूवारी सकाळी रुळ देखभालीचे काम करत होते. त्यावेळी मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून एक बाटली त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आली. यात संपत यांना गंभीर दुखापत होऊन त्यांच्या हाताला मार लागला आहे. त्यांच्यावर कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याची माहिती सीआरएमएस या रेल्वे संघटनेचे युवाअध्यक्ष मंतोश मिश्रा यांनी दिली आहे. यापूर्वीदेखील अशा अनेक घटना घडल्या असून या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप संघटनेचे सहाय्यक सचिव मनोज कवडे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने तरूण जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -