घरमहाराष्ट्रजर फॉर्म्युलाच ठरला नाही तर चर्चा कसली? - संजय राऊत

जर फॉर्म्युलाच ठरला नाही तर चर्चा कसली? – संजय राऊत

Subscribe

शिवसेना युती धर्माचे पालन करत आहे. जर कुणी युती धर्म पाळत नसेल तर ती त्यांची चूक आहे. आम्ही योग्य नीतीवर काम करतो. सत्तेसाठी आम्ही भुकेलेलो नाही. आमच्याकडे सत्तास्थापनेचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत, मात्र सत्तेसाठी लोकशाहीची हत्या आम्ही करणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने युतीची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४५ जागा असतील तर त्यांना कोण रोखणार? उद्या खडसे आले आणि म्हणाले माझ्याकडे १४५ लोक आहेत त्यांना कोण रोखणार? माझ्याकडे १४५ लोक असतील मला कोण रोखणार? शरद पवार १४५ जागा घेऊन आले त्यांना कोण रोखणार? ज्यांच्याकडे एकने जास्त आमदार असेल तो मुख्यमंत्री होईल. एका मताने वाजपेयींचे सरकार पडले होते

- Advertisement -

आम्ही कोणतीही चुकीची मागणी करत नाही, लोकसभेच्या वेळी जो फॉर्म्युला ठरला त्यानुसारच आमची मागणी आहे. जनतेचा निर्णय जनतेने दिला आहे. आमची समजूत वगैरे काढण्याची गरज नाही, आम्ही काही हट्टाला पेटलेले नाही. सामनामधूनही मी पक्षाचीच भूमिका मांडतो आहे. आमचे जे ठरले होते ते सोडून आम्ही वेगळे काय मागतो आहोत?, लोकसभेआधी जे ठरले होते, तेच द्यायचे आहे,आम्ही चुकीचे काही मागत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही,असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्यावतीने जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे घेतील, उद्धव ठाकरेच याबाबत बोलतील.याठिकाणी नीती, धर्म आणि सत्याच्या गोष्टी आम्ही करतो. येथे शरद पवार आहेत, ज्यांनी भाजपविरोधात उभे राहून निवडणूक लढवली. याठिकाणी काँग्रेस आहे ज्यांच्याकडे एक आकडा आहे, जो कधीही भाजपसोबत जाणार नाही. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे बनले आहे, असेही राऊत म्हणाले.

- Advertisement -

दुष्यंत चौताला यांच्यावर टिका
शिवसेनेच्या वतीने जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे घेतील, उद्धव ठाकरेच याबाबत बोलतील. महाराष्ट्रात कुणी दुष्यंत नाही, ज्याचे वडील जेलमध्ये आहेत. याठिकाणी नीती, धर्म आणि सत्याच्या गोष्टी आम्ही करतो. येथे शरद पवार आहेत, ज्यांनी भाजपविरोधात उभे राहून निवडणूक लढवली. याठिकाणी काँग्रेस आहे ज्यांच्याकडे एक आकडा आहे, जो कधीही भाजपसोबत जाणार नाही. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे बनले आहे, असेही राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या विधानावरून दुष्यंत चौताला यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माझे वडील अजय चौताला हे गेल्या ६ वर्षांपासून तुरुंगात आहेत मात्र, राऊतांनी कधीही त्यांची चौकशी केली नाही. अजय चौताला आपली शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय तुरुंगातून बाहेर येणार नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांना अशी विधाने करणे शोभत नाही, असे दुष्यंत चौताला म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -