घरमुंबईगडाखांच्या पाठिंब्यामागे ‘मातोश्री’ची चाणक्यनीती

गडाखांच्या पाठिंब्यामागे ‘मातोश्री’ची चाणक्यनीती

Subscribe

राज्यातील मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत दिलेला कौल पाहता कोणत्याही पक्षाला आपली ताकद मित्रपक्ष आणि अपक्ष यांच्या भरवश्यावर वाढवावी लागेल. सत्तेच्या या समीकरण बदलवण्याच्या खेळात शिवसेनेने सोमवारी नेवासाचे आमदार आणि नगर जिल्ह्यातले बडे प्रस्थ यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख यांच्याकडून पाठिंब्याचे पत्र मिळवले.

शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी खासगी विमानाने नाट्यमयरित्या मातोश्रीवर आणले आणि मोहीम फत्ते केली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय या पिता पुत्रांनी धावतपळत यशवंतराव गडाखांचे घर गाठून त्यांना ‘समजावण्याचा’ प्रयत्न केला. तो प्रयत्न अपयशी ठरला आणि विखेंची अडचण निकालानंतर आणखीनच वाढली आहे.

- Advertisement -

राज्यभरात दिवाळी पाडवा सुरु असताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे चाणक्य समजल्या जाणार्‍या मिलिंद नार्वेकरांनी आपला पाडवा राजकीय फटाके फोडून साजरा केला. मातोश्रीवर अनोख्या पद्धतीने साजर्‍या झालेल्या या आतिषबाजीचा धूर नगरच्या पालक मंत्री पदाची स्वप्ने पाहणार्‍या राधाकृष्ण विखे पाटलांच्या नाका तोंडात गेला. सोमवारी दुपारी खासगी विमानाने मिलिंद नार्वेकर शिर्डी आणि तिथून पुढे मोटारीने नेवासा येथे गेले. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळाची देवाण घेवाण करून आमदार शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांना घेऊन मातोश्रीवर आले. तिथे गडाख यांनी शेतकरी क्रांती पक्षाचा पाठिंबा असलेले पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपविले. गडाख यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत पाठिंबा दिला होता. आता शिवसेनेची संख्या ४ अपक्षांसह ६० झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -