घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो, शिवसेना खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो, शिवसेना खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

Subscribe

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीची आहे.

परभणी जिल्हाधिकारी बदली प्रकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारामध्ये वाद आता वाढतच चालला आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदली प्रकरणावरुन परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. बदलीची शिफारस केल्यावर राष्ट्रवादीनं रान उठवलं आहे. वेळ आल्यास राष्ट्रवादीला आम्ही केव्हावी पायाखाली घालू शकतो असे खळबळजनक वक्तव्य मेळाव्यामध्ये भाषण करताना केलं आहे. खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता आहे.

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना म्हटलं आहे की, शेवटी काही मर्यादा असतात. शेवटी कुठपर्यंत शांत बसून सहन करायचं. आमच्याही भावना अनावर होतात लक्षात ठेवा. माकडीणसुद्धा स्वतःवर बुडाची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हावी पायाखाली घालू शकतो. आम्ही आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलो आहोत असे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान जिल्हाधिकारी बदलायचा होता यासाठी केवळ मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. मात्र राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीची आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मानला पण प्रत्येक गोष्टीमध्ये खाजवाखाजवी सुरु आहे ही वस्तुस्थिती असल्याचे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीक ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. आंचल गोयल ३१ जुलै रोजी पदभार स्वीकारणार होत्या मात्र त्यांना त्याच दिवशी मुंबईत बोलवल्याने त्यांना पदभार स्वीकारता आला नाही. आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात यामुळे काही खासदार, आमदार आणि नेत्यांना त्या जिल्हाधिकारी म्हणून नको यासाठी दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे. हा वाद चव्हाट्यावर आल्यावर मंत्रिमंडळ बैठकत आंचल गोयल याच जिल्हाधिकारी असतील असा निर्णय करण्यात आला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -