घरमहाराष्ट्रनाशिकमाजी नगरसेवक चांदवडकरच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ

माजी नगरसेवक चांदवडकरच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ

Subscribe

सायबर क्राईम अ‍ॅक्टअंतर्गत पोलिसांनी केला गुन्हा दाखल

महिलेस व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह विविध प्रकारचे आरोप असलेल्या भारतीय जनता पार्टीचे माजी स्वीकृत नगरसेवक विक्रांत चांदवडकर यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चांदवडकर यांना सोमवारी (ता.२७) न्यायालयात हजर केले असता जामीन अर्ज फेटाळून लावत तब्बल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पीडितेचा पाठलाग करून विनयभंग करणे, मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवणे, तसेच याविषयी कोणाला माहिती दिली, तर कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (ता. २१) पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन तक्रार मांडली. तसेच, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली. सायबर क्राईम अ‍ॅक्टअंतर्गत पोलिसांनी चांदवडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चांदवडकर यांना गुरुवारी (ता.२३) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २७ मे २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, सोमवारी (ता.२७) चांदवडकर यांना पुन्हा न्यायालयात हजर केला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून ९ जूनपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. सी. सांगळे तपास करत आहेत.

- Advertisement -

महिला पदाधिकार्‍याची गाडी ट्रॅक करण्याचा प्रयत्न?

चांदवडकर यांचे वेगवेगळे ‘प्रताप’ आता पोलिसांसमोर येत आहेत. एका महिला राजकीय पदाधिकार्‍यानेही पोलिसांशी भेट घेऊन आपबिती सांगितल्याची चर्चा आहे. यात संशयित आरोपीने तिच्या गाडीला जीपीएस प्रणाली लावून ही गाडी कोठे कोठे जाते हे ट्रॅक केल्याची तोंडी तक्रार करण्यात आल्याचे समजते. याशिवाय अन्य काही महिलांच्याही अशा प्रकारच्या तक्रारी असून येत्या काही दिवसात त्या देखील गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -