घरमहाराष्ट्रमला धमकावणारा अजून जन्माला आलेला नाही - संजय राऊत

मला धमकावणारा अजून जन्माला आलेला नाही – संजय राऊत

Subscribe

ईडीच्या नोटीसीवरुन शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत सध्या चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी दोन ते चार दिवसांचा वेळ मागणार आहे, असं सांगितलं. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत धमकावलंही जातं असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हटलं होतं. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, मला धमकावणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि मला धमकावणारा राहणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. दरम्यान, सोमवारी पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी विरोधकांचा समाचार घेतला. भाजपच्या १२० जणांची यादी माझ्याकडे आहे. ईडी त्यांच्यावर कारवाई करतं का ते बघायचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. मात्र, मी अद्याप ती पाहिलेली नाही. पण मी सांगितलं आहे की, त्या नोटीसीला सविस्तर उत्तर द्या. त्यासाठी पुढची वेळ मागुन घ्या. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. जे काही आमच्याकडे आहे, ते आम्ही लपवलं नाही. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ते भाजपमध्ये जातात. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. सरकारचा कागद आला असला तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कायद्याला आम्ही मानतो. देशात कायदा मोठा आहे. कायदा दबावाखाली असला तरी आम्ही कायद्याचा आदर करतो. जे काही मला लोकांच्या समोर ठेवायचं होतं ते मी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. अजून बरंच काही सांगायचं आहे. वेळ आल्यावर सर्व काही हळू हळू सांगेन, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेत मरणार. आणि हे सरकार सुद्धा पाच वर्ष टिकणार असा विश्वास संजय राऊत व्यक्त केला. ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपचं बॅनर लावलं असेल तर ती लोकभावना असणार असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -