घरमहाराष्ट्रSiddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा सांगलीत जाहीर सत्कार; कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन

Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा सांगलीत जाहीर सत्कार; कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन

Subscribe

 

सांगलीः कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगली जिल्हा कॉंग्रेस रविवारी जाहीर सत्कार करणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दबक्या आवाजात दावा सांगितला आहे. सिद्धरमय्या यांच्या सत्काराच्या निमित्ताने कॉंग्रेस आपली ताकद दाखवत असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

सागंलीतील जागेवर भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील पुन्हा संधी मिळेल या आशेवर आहेत. या आशेवर त्यांनी तयारीही सुरु केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना संधी मिळाली होती. यावेळी पाटील हे कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छूक आहेत. कॉंग्रेसकडून तिकिट मिळेल या अपेक्षेवर पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.

हेही वाचाःकाँग्रेसची भारत जोडो तर भाजपची तोडण्याची विचारधारा, राहुल गांधींचा हल्लाबोल

- Advertisement -

सांगलीमध्ये २५ जून २०२३ रोजी हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. कल्पद्रुप क्रीडांगण येथे हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विश्वजीत कदम हे या मेळाव्याचे आणि सत्कार समारंभाचे स्वागताध्यक्ष आहेत.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचाही दावा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. पाटील यांना दोन नंबरची मते मिळाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने या जागेवर दावा केला आहे. तर आमचीही सांगलीतील ताकद वाढली असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. ही जागा कोणा एका घटकाची नाही. ही जागा कॉंग्रेसची आहे, असा पवित्रा  विश्वजीत कदर यांनी घेतला आहे. तर या जागेबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपचे संजयकाका पाटील यांचीही जुळवाजुळव

भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनीही मतांची जुळवाजुळव सुरु केली आहे. भाजप पुन्हा संधी देईल, अशी पाटील यांना आशा आहे. याच आशेवर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर आपल्या विरोधात होते. आता पडळकर हे भाजपत आहेत. मते फुटणार नाहीत. त्यांची मतेही मलाच मिळतील, असा पाटील यांना विश्वास आहे. निवडून येण्यासाठी लोकांची कामे करावी लागतात. लोकांमध्ये राहावं लागतं, असा टोला संजयकाका पाटील यांनी कॉंग्रेसकडून इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांना लगावला. जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही, असेही संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले. संजयकाका पाटील यांच्या टीकेला विशाल पाटील यांनी सोशल मीडियावरुन उत्तर दिले आहे. यासाठी विशाल पाटील यांनी सोशल मीडियावर खास कॅम्पेन राबवलं आहे. नाकी नऊ आलेली नऊ वर्ष, असं या कॅम्पेनच नाव आहे. खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केल, असा सवाल या कॅम्पेनमधून उपस्थित करण्यात आाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -