घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'ती' रेल्वे स्थानकात एकटीच होती, 'त्या' नराधमांनी वडापाव मधून गुंगीच औषध दिल...

‘ती’ रेल्वे स्थानकात एकटीच होती, ‘त्या’ नराधमांनी वडापाव मधून गुंगीच औषध दिल आणि….

Subscribe

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकात अत्यंत भयानक प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. स्थानकात एकटी असलेल्या एका विवाहित तरुणीवर तेथील एका पाणी बाटली विक्रेत्याने आपल्या रिक्षाचालक मित्राच्या मदतीने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील महिलांची सुरक्षितता आणि विशेषतः नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या परीसारत वाढलेली गुन्हेगारी, टवाळखोरी, अवैध धंदे यांचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.

घडले असे की, १९ वर्षीय पिडीत महिलेची घरची परिस्थिती गरिबीची असून ती गुजरातहून मुंबई आणि मुंबईहुन पंजाब मेलने बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली होती. दरम्यान तिच्याकडे मोबाईल नसल्याने सहप्रवाशाच्या मोबाईलवरून तिने नाशिक मध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन केला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने ‘मी आता येऊ शकणार नाही तू स्थानकावरच थांब’ असे बहिणीने तीला सांगितले. प्लॅटफॉर्म दोन वरील एका बाकड्यावर पिडीत महिला बसली होती.

- Advertisement -

दरम्यान रात्री दोन वाजेच्या सुमारास पाणी विक्रेता कुणाल तिच्याजवळ आला आणि मदतीच्या बहाण्याने गप्पा करत तिला वडापाव खाण्यासाठी दिला. मात्र वडापाव खाताच तिला हळू हळू चक्कर येऊ लागली. त्यानंतर कुणालने तिला प्लॅटफॉर्म बाहेर बळजबरी नेत प्रकाश मुंढे या आपल्या रिक्षाचालक मित्राच्या रिक्षेत तिला बसवत गुंगीचे औषधही पाजले आणि जवळपास ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चेहडी परिसरात मळे भागात नेत शेतात तिच्यावर त्यांनी आळीपाळीने अत्याचार केला.

रेल्वेस्थानक रात्रभर सुरू असते या आशेने त्याठिकाणी आश्रयास असलेल्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर पाणी विकणाऱ्या कुणाल पवारने आपल्या रिक्षाचालक मित्राच्या मदतीने अत्याचार केलाय. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तसेच परिसरातील अनाधिकृत विक्रेते रिक्षाचालक यांच्यावर नियंत्रण कोणाचे? नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रिक्षा चालकांच्या बाबत अनेकदा महिलांची छेडछाड, प्रवाश्यांशी हुज्जत, दमदाटी, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, पोलीस प्रशासन त्याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -