घरक्राइमपुणे-सोलापूर महामार्गावर 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या 6 जणांना अटक

पुणे-सोलापूर महामार्गावर 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या 6 जणांना अटक

Subscribe

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला तातडीने सुरूवात केली. त्यानंतर या आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. (six accused arrested for robbing rs 3 60 crore by firing on pune solapur highway)

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आंगडीया कंपनीच्या वाहनातून ही लूट करण्यात आली होती. गोळीबार करत रक्कम लुटल्याप्रारकरणी इंदापूर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैकी फक्त 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

- Advertisement -

उर्वरित रक्कम वसूल करणे अद्याप बाकी असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे टाकले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती.

त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. पोलीसांच्या पथकाने सागर शिवाजी होनमाने राहणारा कुर्डूवाडी ता. माढा जि.सोलापूर याने इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

त्यानुसार पोलीसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (32) आणि रजत अबू मुलाणी (24) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी तपासात सागर होनमाने याकडून 72 लाख रुपये, रजत अबू मुलाणी याचेकडुन 71 लाख 20 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 43 लाख 20 हजार रूपये जप्त केले आहेत.

दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना केले होते. त्या पथकाने गुन्ह्यातील सहभाग असणारे आरोपी गौतम अजित भोसले (33), किरण सुभाष घाडगे (26), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (25) यांना राजस्थान उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेतलेले आहे.


हेही वाचा – धोकादायक! 241 किमी ताशी वेगाने जपानच्या दिशेने सरकतेय हिनानॉर चक्रीवादळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -