घरमहाराष्ट्रपुण्यात लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा मृत्यू

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा मृत्यू

Subscribe

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून एका सात वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील घोरपडी पेठेमध्ये लिफ्टमध्ये अडकून एका ७ वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. नशरा रेहमान खान (७) असे या मुलीचे नाव आहे. लिफ्ट न थांबल्याने घाबरलेल्या मुलीने लिफ्टचा पहिला दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये थांबल्याने ही चिमुरडी लिफ्टमध्ये अडकली. यामध्ये नशरा जखमी झाली आणि तिचा त्यातच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

घोरपडे पेठेतील मोमीनपुरामधील जोहरा कॉम्प्लेक्समध्ये ही चिमुरडी राहत होती. ही मुलगी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहते. नशरा दररोज लिफ्टने एकटी ये-जा करत असे. त्याप्रमाणे ती शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नानकटाई आणण्यासाठी खाली गेली. या मुलीने नानकटाई घेऊन लिफ्टमध्ये शिरली आणि या मुलीने तिसऱ्या मजल्याचे बटन दाबले. लिफ्ट सुरु झाली मात्र ही लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली नाही. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली नसल्याने नशरा या चिमुरडीने लिफ्टचा पहिला दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याने ही लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजलयाच्या मध्यभागी थांबली. या चिमुरडीने आरडोओरड करत बाहेर येण्याचा आतोनात प्रयत्न केला असावा आणि त्यात ती गमभीर जखमी झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

घाबरलेल्या नशराने अडकल्याचे कळण्यानंतर आरडाओरड केला. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील सदस्यांनी आणि रहिवाशांनी लिफ्टकडे धाव घेतली. त्यावेळी लिफ्टमध्ये नशरा अडकल्याचे रहिवाशांना कळले. रहिवाशांने पोलीस आणि अग्निशमन दलाला तात्काळ बोलावून घेतले. अग्निशमन जवानाने जखमी नशराला बाहेर काढत तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नशराचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुरडी लिफ्टमध्ये कशी अडकली याचा तपास सुरु असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या

- Advertisement -

वाचा – पुणे-मुंबई खाजगी कारने प्रवास करताना सावधान

वाचा – आजीनेच केली नातीची हत्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -