घरमहाराष्ट्रभगवान के घर मे देर है, लेकिन अंधेर नही!

भगवान के घर मे देर है, लेकिन अंधेर नही!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून निफाड तालुक्याचा तापमान हे चांगलेच घसरले आहे. या कडाक्याच्या थंडीत लासलगांव येथील रेल्वे स्टेशन परिसरात एक वयोवृद्ध व्यक्ती फिरत होती. याबाबतची माहिती समाजसेवक दत्तुलाल शर्मा आणि संजय बिरार यांना मिळाली.

लासलगांव येथील पांढर करमाळाचे रहिवाशी सखाराम संभा लकडे हे आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाकडे स्थलांतर करत असे. आपल्या पत्नीच्या पश्च्यात त्यांना तीन मुले होती. परंतु, तिनही मुलांचेही अकाली निधन झाले. त्यामुळे वयोवृद्ध लकडे एका गावावरुन दुसऱ्या गावाकडे फिरत. असेच ते फिरत फिरत लासलगावला पोहचले. गेल्या काही दिवसांपासून निफाड तालुक्याचा तापमान हे चांगलेच घसरले आहे. या कडाक्याच्या थंडीत लासलगांव येथील रेल्वे स्टेशन परिसरात एक वयोवृद्ध व्यक्ती फिरत होती. याबाबतची माहिती समाजसेवक दत्तुलाल शर्मा आणि संजय बिरार यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब या वयोवृद्ध लकडे बाबांची भेट घेतली. यावेळी थंडी इतकी होती की, लकडे यांना बोलताही येत नव्हते.

अश्रू झाले अनावर

लासलगांवचे सामाजिक कार्यकर्ते दत्तूलाल शर्मा आणि संजय बिरार यांनी बाबाला दुकानात बसवून बाबांशी चर्चा केली. यावेळी बाबाचे नाव सखाराम संभा लकडे असून पांढरा करमाळचे ते रहिवाशी असल्याचे समजले. घरी कोण कोण राहते असे विचारले असता बाबांचे अश्रू अनावर झाले. एक मोठा श्वास घेऊन ते म्हणाले की, “बायको मेली असून तीन मुले होती एका मागो माग तिघे मेली, माझ्या कडे ना घर – ना शेती- ना पैसा. गावात खायचे वांदे म्हणून फिरतो इकडं तिकडं. अंगाला शहारे येणार अशी बाबांची हकिकत ऐकून दत्तूलाल शर्मा आणि संजय बिरार यांच्या डोळ्यातील अश्रु अनावर झाले. बाबा कोणत्या गावावरुन आले, असा प्रश्न विचारले असता बाबा म्हणाले की, “अरे लई फिरलो मी! मुंबई, पुना, नांदेड, अजून बरीच गावे पण कुठेच गुजारा झाला नाही आणि आलो इकडे!”

- Advertisement -

अखेर वृद्धाश्रमात दाखल

याविषयी बोलताना दत्तूलाल शर्मा यांनी सांगितले की, “मी बाबांना विचारले, तुम्ही आश्रमात राहणार का? तुमची सर्व व्यवस्था होईल. तेव्हा बाबांनी उत्तर दिले की, “अरे मरेपर्यंत सांभाळणार का मला?” बाबाच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे थोडा गडबडलो. बाबा तुम्ही फक्त आश्रमात चला! तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला मरेपर्यंत आता आमचा नवनाथ भाऊ नक्कीच सांभाळेल!” दत्तू शर्मा यांनी वृद्धाश्रमाचे संचालक नवनाथ यांना माहिती दिली. नवनाथ बाबांना ऋषी आश्रमात घेऊन गेले. नवनाथ यांच्या सेंगऋषी वृद्ध आश्रमात बाबा दाखल झाले आणि बाबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. एन थंडीत वयोवृद्ध बाबाचे होणारे हाल अखेर थांबले. म्हणतात ना, ‘भगवान के घर मे देर है, लेकिन अंधेर नही’ अगदी तसेच हे घडले.


हेही वाचा – आई-वडिलांचा सांभाळ नाही केला तर पगारातून पैसे कापले जातील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -