घरमहाराष्ट्रRation shopkeepers Strike : रेशन दुकानदारांच्या संपात फूट, 'ही' महत्त्वाची संघटना राहिली...

Ration shopkeepers Strike : रेशन दुकानदारांच्या संपात फूट, ‘ही’ महत्त्वाची संघटना राहिली दूर

Subscribe

राज्यातील रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी फूट पडली आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर फेडरेशन पुणे या संघटनेने या संपात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

नाशिक : नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील 50 हजारांपेक्षा अधिक रेशन दुकानदार संप पुकारणार असल्याची घोषणा रास्त भाव दुकानदारांच्या महासंघाकडून दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या संपामध्ये रेशन दुकानदारांच्या विविध संघटना सहभागी होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती. परंतु, पहिल्याच दिवशी या संपामध्ये फूट पडली असल्याची माहिती समोर आली आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर फेडरेशन पुणे या संघटनेने या संपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. तर 25 हजारांपेक्षा जास्त रेशन दुकानदारांनी या संपाला पाठिंबा दिला नसल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. ज्यामुळे या संपात मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. (Split in Ration Shopkeepers Strike, ‘this’ important organization remains away)

हेही वाचा… BJP : मोदी सरकारचे मौन रामराज्याच्या कुठल्या संकल्पनेत बसते? ठाकरे गटाचा थेट प्रश्न

- Advertisement -

पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील मिळून रेशन दुकानदारांची संख्या ही 53 हजार आहे. विविध प्रलंबित न्याय हक्क मागण्यांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याचे कारण देत महासंघाकडून या संपाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, या संपात आता मोठी फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपाला कोणताही अर्थ नसल्याचेही फेडरेशनकडून सांगण्यात आले आहे. रेशन दुकानदारांच्या विविध मांगण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती देखील संघटनेकडून देण्यात आली आहे.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर फेडरेशन पुणे या संघटनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष कापसे यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, मागण्यांच्या संदर्भामध्ये राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 11 डिसेंबरला नागपूरात मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चामध्ये ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर फेडरेशन पुणे या संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात 25 ते 30 हजार रेशन दुकानदारांचा मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आमच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत त्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून आश्वासन देखील दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आश्वासन दिल्याने ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर फेडरेशन पुणे, नाशिक जिल्ह्यातील संघटना आणि अन्य फेडरेशन या संपात सहभागी नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर साधारणतः 25 ते 30 हजार दुकानदार हे या संपात सहभागी नसून महासंघाने फेडरेशनच्या अध्यक्षांना विश्वासात न घेता हा संप पुकारला आहे. पंरतु, सामंजस्याने मार्ग निघत असेल तर आंदोलन किंवा संप करून मार्ग निघणार नसल्याची स्पष्ट भूमिका फेडरेशनच्या नाशिक जिल्हाध्यक्षांकडून घेण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -