घरताज्या घडामोडीमुंबईत पावसाची उसंत; तीन ठिकाणी घरांच्या पडझडी; 4 जण जखमी

मुंबईत पावसाची उसंत; तीन ठिकाणी घरांच्या पडझडी; 4 जण जखमी

Subscribe

मुंबई: मुंबईत गेल्या 17 जुलैपासून सलग मुसळधार बरसात करणाऱ्या पावसाने आज मात्र काहीशी उसंत घेतली. मात्र शहर व उपनगर भागात तीन ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडून त्यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा, दोन महिला व एक पुरुष असे चारजण जखमी झाले आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मुंबईत दिवसभर पावसाने हलक्या सरींची बरसात केली. व्यापारी, दुकानदार, नोकरदार, फेरीवाले आदींसह सामान्य नागरिकांनी पावसाच्या फेऱ्यातून सुटलो बुवा एकदाचे, असे म्हणत सुटकेचा निःश्वास सोडला. शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत शहर भागात फक्त 6.99 मिमी, पूर्व उपनगर – 10.87 मिमी आणि पश्चिम उपनगर – 13.10 मिमी इतक्या पावसाची नोंद केली आहे. आज सुमद्राला भरती होती मात्र पावसाचा जोर अजिबात नव्हता. त्याममुळे कुठेही पाणी साचण्याचा व त्यांचा जनजीवनावर परिणाम होण्याचा काहीच प्रश्न उद्भवला नाही. मात्र आगामी 24 तासांत मुंबई शहर व उपनगरे भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

विविध ठिकाणी घरांच्या पडझडीत चारजण जखमी

मुंबईत पावसाने उसंत घेतली असली तरी दुर्घटना घडणे काही थांबत नाहीत. शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत धारावी, चेंबूर, देवनार या तीन विविध ठिकाणी घरांचे काही भाग कमी – अधिक प्रमाणात कोसळून एक 13 वर्षीय मुलगा, दोन महिला व एक पुरुष असे चारजण जखमी झाले आहेत. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना धारावी येथे घडली. धारावी, 90 फिट रोड, गणेश मंदिर, माता महाकाळी मंदिर येथे सकाळी 8 वाजता तळमजला अधिक एक मजली घराच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीचा भाग कोसळून त्यामध्ये प्रिया सिल्वा राज (45) ही महिला जखमी झाली. तिला सायन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisement -

दुसरी घटना चेंबूर(प.) सिद्धार्थ कॉलनी, के. एन. गायकवाड मार्ग, महादेव भिडे प्लॉट विशाल चायनीज फूडजवळ दुपारी 3.20 वाजताच्या सुमारास तळमजला अधिक एक मजली घराच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीचा भाग कोसळून त्यामध्ये गणेश कांबळे (13) हा मुलगा जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तिसरी घटना देवनार कत्तलखाना येथे घडली. जय हनुमान सेवा मंडळ, सुवासिनी चाळ येथे दुपारी 3.20 वाजताच्या सुमारास तळमजला अधिक एक मजली घराच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीचा भाग कोसळून त्यामध्ये राम सेवक (52 / पुरुष) आणि मीना गुप्ता (46/ महिला) असे दोघेजण जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या शताब्दी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार झाल्यावर त्यांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेससोबत खुलेआम गेलो, तुमच्यासारखं लपून छपून नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -