घरमहाराष्ट्रसाताऱ्यात एसटी-ट्रकची समोरासमोर धडक; ३२ प्रवाशी गंभीर जखमी

साताऱ्यात एसटी-ट्रकची समोरासमोर धडक; ३२ प्रवाशी गंभीर जखमी

Subscribe

या अपघातामध्ये ३२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये १४ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना ताबडतोब वाईच्या मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

साताऱ्यामध्ये एसटी बस आणि ट्रकला भीषण अपघात झाला आहे. साताऱ्याच्या बोरगावजवळ ही घटना घडली आहे. वाई आगारातील वाई-आकोशी एसटी बसला हा अपघात झाला आहे. वाईहून बोरगावकडे येणाऱ्या वाळूच्या ट्रकची आणि एसटी बसची समोरा समोर धडक झाली. या अपघातामध्ये ३२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ट्रकचालक निहाल जाधव हा देखील गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जिवितहानी झाली नाही.

अशी घडली घटना

बोरगावजवळ एसटी बस आणि वाळूच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. वाई – आकोशी एसटी बस आकोशीला जाऊन परत वाईकडे येत होती. दरम्यान बोरगावजवळ एसटी बस आणि वाईवरुन येणाऱ्या वाळूच्या ट्रकमध्ये अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने या एसटी बसमध्ये शाळकरी आणि कॉलेजचे विद्यार्थी बसले होते. या अपघातामध्ये ३२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये १४ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना ताबडतोब वाईच्या मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisement -

मिशन रुग्णालयात उपचार सुरु

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. दरम्यान वाईच्या मिशन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांवर उपचार करण्यास विरोध केला. मात्र महामंडळाने खर्चाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -