घरमुंबईमुलावर शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच केला अत्याचार!

मुलावर शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच केला अत्याचार!

Subscribe

चौथीच्या एका मुलावर त्याला शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे.

शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा चालकानेच ४थ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार भांडुप येथे उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भांडुप पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंग लिंगवाल (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. भांडुप पश्चिम परिसरात राहणारा सुरेंद्रसिंग हा त्याच्या रिक्षातून खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचे काम करतो. भांडुप येथील शाळेत ४थ्या इयत्तेत शिकणारा ९ वर्षांचा पीडित विद्यार्थी हा दररोज सिंग याच्याच रिक्षातून शाळेत आणि शाळेतून घरी येत जात होता. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी घरीच होते.

नक्की काय घडलं त्या दिवशी?

११ नोव्हेंबर रोजी सिंगने पीडित विद्यार्थी याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या मुलाला दिवाळीच्या फराळासाठी पाठवा असे सांगितले. वडिलांनी मुलाला विचारून पाठवतो असे सिंगला सांगितले.
पीडित विद्यार्थी याला त्याची आई दुपारी अर्ध्या वाटेपर्यंत सोडून आली. सिंग याने घरी आलेल्या विद्यार्थ्याला दिवाळीचा फराळ खायला देऊन त्यानंतर त्याला पोटमाळ्यावर बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. सायंकाळ होऊन देखील मुलगा अजून घरी न परतल्यामुळे चिंतेत असलेली आई त्याला शोधत असतानाच तो रडत रडत येत असतांना दिसला. आईने त्याला रडण्याचे कारण विचारले असता त्याने सर्व हकीकत आईला सांगितली.

- Advertisement -

हेही धक्कादायकच! – स्कूल बस चालकाने ५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण

मुलाच्या पालकांनी हिंमत दाखवली म्हणून…

मुलावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे हादरलेल्या आईने घडलेला प्रकार पतीला सांगितला. दुसऱ्या दिवशी पीडित विद्यार्थ्यांचे आई-वडील रिक्षा चालकाला जाब विचारण्यासाठी गेले असता रिक्षा चालकाच्या मुलाने त्यांना शिवीगाळ करून माझे वडील असे करणारच नाहीत असे सुनावले. हतबल झालेले पीडित मुलाचे आई वडील या गोष्टीची कुठे वाच्यता नको म्हणून काही दिवस गप्प राहिले. मात्र अखेर पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी शनिवारी सायंकाळी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिक्षा चालक सुरेंद्र सिंग लिंगवाल याच्या विरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, धमकी देणे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -