घरमहाराष्ट्रST Workers : एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या घरावर धडक, 'सिल्व्हर ओक' बाहेर...

ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या घरावर धडक, ‘सिल्व्हर ओक’ बाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Subscribe

गेले पाच महिन्याहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी राष्ट्रवाsharad pawarदी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानावर धडक दिली. पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

पवारांच्या विरोधात घोषणाबाजी

एसटी कर्माचऱ्यांनी शरद पवारांच्या घराबाहेर ठिय्या मांडत पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्या त्याला ‘चोरांचे पुढारी’ शरद पवार जबाबदार आहेत, अशी तिव्र प्रतिक्रिया एसटी कर्मचारी आंदोलकांनी दिली. ‘चोरांचे सम्राट शरद पवार आणि अजित पवार’ यांच्याविरोधातला हा आक्रोश असल्याची संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

हे चोरांचं सरकार, इथले वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत, असं कर्मचाऱ्यांनी म्हटलं. या नेत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हे चोरांचं सरकार आहे, आमच्यावर अन्याय होतोय हे दिसत नाही का? महाराष्ट्राच्या जडणघडणीत आमचाही वाटा आहे, असं सटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

मागील ५ महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची नवी मुदत देतानाच एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. सोबतच सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे निर्देश हायकोर्टाने एसटी महामंडळाला दिले आहेत.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -