घरताज्या घडामोडीSSR Death Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास कुठंपर्यंत? CBIने RTIला दिलं...

SSR Death Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास कुठंपर्यंत? CBIने RTIला दिलं उत्तर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. सीबीआय अजूनपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. याबाबत सीबीआयने माहिती देण्यास नकार दिला आहे. माहितीच्या अधिकाऱ्यांअंतर्गत सीबीआयकडून याप्रकरणाची माहिती देण्याची मागणी केली होती. पण सीबीआयने या अर्जावर माहिती देण्यास नकार दिला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सीबीआय पथकाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबतची माहिती देण्यास नकार दिला आहे. आरटीआय अंतर्गत मागितलेल्या माहितीचे उत्तर देताना सीबीआयने सांगितले की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे. त्यामुळे माहिती दिल्याने तपासावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मागितलेली माहिती दिली जाऊ शकत नाही.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते. परंतु सुशांतच्या कुटुंबियांच्या मागणीनंतर याप्रकरणाचा तपास सुरू केला. मग सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले. सीबीआय व्यतिरिक्त ड्रग्ज अँगलमध्ये एनसीबी याप्रकरणात तपास करत आहे. दरम्यान या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केली होती. पण नंतर दोघांना जामीनावर सुटका केली होती.

- Advertisement -

सुशांतने ‘काई पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले होते. या चित्रपटानंतर सुशांतने अनेक चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडमधील स्थान पक्के केले.त्याच्या बॉलिवूड करियरमधील ‘एमएस धोनी’, ‘छिछोरे’, ‘शुद्ध देसी रोमांस’ असे सुपरहिट चित्रपट दिले. यातील ‘दिल बेचारा’ हा चित्रपट त्याच्या करियरमधील शेवटचा सिनेमा ठरला.


हेही वाचा – अॅक्शन हिरो टायगर श्रॉफची संगीत क्षेत्रात एन्ट्री, ‘या’ गाण्याला दिला आवाज


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -