घरमहाराष्ट्रST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेणार – अनिल परब

Subscribe

‘एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करायची की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी सांगितले आहे. “आजच्या बैठकीत काय निर्णय होतो तो त्यावर पुढे कशापद्धतीने मेस्मा लावायचा किंवा काय करायचे हे ठरवले जाईल.” असेही अनिल परब म्हणाले. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि वेळच्या वेळी वेतन अशासंदर्भात निर्णय घेतले आहेत. विलीनीकरणाचा निर्णय कोर्टानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती कडून होणार आहे. काही वकिलांनी एसटी कर्मचाऱ्यांना २० तारखेला विलीनीकरणाचा निर्णय होईल असं सांगितलंय. आजच्या बैठकीत एसटी संपासंदर्भात मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब म्हणाले. आज ते पत्रकारांशी बोलत होते.

यावर बोलताना अनिल परब पुढे म्हणाले की, “संपाचा तिडा अद्याप कायम आहे. राज्य सरकारला संपाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी करणे शक्य होते, त्या गोष्टींपेक्षा जास्त पगार वाढ दिली आहे. त्यांचे महत्त्वाचे विषय होते त्यामध्ये पगार वेळेवर मिळावा अशी अपेक्षा होती. त्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे. एवढं सगळं करुन ही अजून काही कामगार भरकटलेले आहेत, अजूनही दिशाहीन झाले आहेत. त्यांना असं वाटतंय की ताबडतोब आमचा निकाल लागेल. परंतु उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. विलिनीकरणाचा मुद्दा या समितीकडे सोपवला आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबतीत कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असे वारंवार सांगतोय. तरी देखील त्यांचे वकील त्यांना २० तारखेला कुठल्याही परिस्थितीत विलिनीकरण करुन घेऊ सांगतात अशा प्रकारच्या बातम्या आमच्याकडे येत आहेत. म्हणून २० तारखेपर्यंत आपणं कुणीही कामावर जायचे नाही असा निर्णय घेतल्याच्या बातम्या आमच्याकडे येत आहे. असेही अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

“परंतु या सर्व गोष्टींमध्ये अफवांचे जे पीक आले आहे. यामध्ये एसटीचे आणि कामगारांचे नुकसान होत आहे. वारंवार आवाहन करुनही ते कामावर येत नाहीत. निलंबित केलेल्या कामगारांवर कारवाई सुरु झाली आहे. काही कामगार त्यात बडतर्फ झाले आहे. त्यांना सांगितले जात आहे, या सर्व कारवाया मागे घेतल्या जाणार आहे, परंतु अशाप्रकारे लोकांना वेठीस धरणे योग्य नाही, अशापरिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा देखील लावला जाईल, असेही अनिल परब म्हणाले.


या’ मंदिरात देवाला अर्पण केला जातो चॉकलेटचा प्रसाद


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -