घरताज्या घडामोडीआम्ही धडपडत दहावी पास केली तेव्हा कोरोना कुठे होता, राज ठाकरेंचे वक्तव्य

आम्ही धडपडत दहावी पास केली तेव्हा कोरोना कुठे होता, राज ठाकरेंचे वक्तव्य

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण दौऱ्यावर आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा फार मह्त्वाचा आहे. पुण्यात राज ठाकरेंनी मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या ई -लर्निंग शाळेच्या उद्घाटनावेळी खंत व्यक्त केली आहे. आम्ही धडपडत दहावी पास केली तेव्हा कोरोना कुठे होता अशी मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. आता ई -लर्निंग शाळा होत आहेत. तेव्हा लर्निंगला फक्त आम्ही ई म्हणायचो असे राज ठाकरेंनी सांगितले. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील कोंढावा येथे ई -लर्निंग शाळेचे उद्घाटन केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या कार्यातून ई -लर्निंग शाळा उभी राहिली आहे. या शाळेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. भूमिपूजन झाल्यावर ती वास्तू उभी राहणं महत्त्वाचे आहे. नाहीतर आजपर्यंत आम्ही केवळ भूमिपूजनाच्या पाट्या पाहिल्या आहेत. भूमीपूजन होतात आणि पाट्या दिसतात पुढे काही नाही. ई -लर्निंग आमच्यावेळी असे काही नव्हते लर्निंगला फक्त आम्ही ई म्हणायचो नको ते, असे राज ठाकरे यांनी सांगितल्यावर हशा पिकला होता.

- Advertisement -

….यामुळे मला खंत

दरम्यान राज ठाकेर पुढे म्हणाले की, दोन वर्ष झाली शाळा बंद आहेत. काही ठिकाणी बंद आहेत तर काही ठिकाणी मुलांना पालक शाळेत पाठवत नाही आहेत. कोरोनामुळे सगळं विस्कळीत झालं आहे. मला एक खंत आहे. आता या कोरोनाच्या मुळे दहावीचे विद्यार्थ्यी सगळे पास झाले. परीक्षा न देता १०० टक्के, ९९ टक्के मिळाले आहेत. मी विचार करतो आहे. आमच्या वेळी होता कुठे हा कोरोना, आमची दहावी आम्ही धडधडत पास केली आणि इतक्या वर्षांनी हा कोरोना आला. इतक्या वर्षांनी येऊन इतके गुण, माझे गुण तुम्हाला कळाले तर कमालच वाटेल असे राज ठाकरे म्हणाले.

शाळेत मुलांना खेळताना पाहिलं का बरं वाटत

सध्या घरातून शिकणे घरातूनच शिक्षकांशी बोलण यामुळे शाळेत जाऊन जी मज्जा असते ती मज्जाच निघून गेली आहे. पहिली दुसरीच्या मुलांना आता कळेल काय असते शाळा? पण जे शाळेत जाणारे होते त्यांना कळालेच नसेल शाळा काय असते. आज शाळेत ई-लर्निंग का असेना शाळा सुरु होतेय ही महत्त्वाची गोष्ट आहे. शाळेत मुलांचा चिवचिवाट आणि मुलं खेळत असताना पाहिलं का बर वाटतं. मला तर भीती वाटते की पुढील १० ते २० वर्षांमध्ये मुले लिहू शकतील का नाही? सगळेच कम्प्यूटरवरती होणार मग यांच्या अक्षराची ओळख यांच्या हाताने होणार आहे की नाही? काळ पुढे कशा प्रकारे सरकतो आहे माहिती नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा :  उत्तर कोरियात आनंदी होण्यासह हसण्या, रडण्यावर बंदी, किम जोंगचे आदेश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -