घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी पगार

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी पगार

Subscribe

वेळेआधी पगारासोबतच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटही दिली जाणार असल्याचं, महामंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

नुकतंच एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांची तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचे जाहीर केलं होतं. मात्र, त्यापाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. यावेळी त्यांचे मासिक वेतन ७ तारखेऐवजी १ नाेव्हेंबरला करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. दिवाळीच्या आधीच पगार देणार असल्याचा निर्णय घेऊन एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ अाणि थकबाकी रक्कमेच्या ४८ हप्त्यांपैकी ५ हप्ते अाॅक्टाेबरच्या वेतनात देण्यात येणार असल्याचं, महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं अाहे. त्यामुळे एकंदरच एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी भरभराटीची जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अानंदात जावी यासाठी एसटी महामहामंडळाने २२ अाॅक्टाेबर राेजी कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अाणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे परीपत्रक जारी केले होते. आता त्यासाेबतच एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरिम वेतनवाढ तसेच एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या महागार्इ भत्त्यातही वाढ जाहीर केली. ही वेतनवाढ अाॅक्टाेबर २०१८ पासून लागू हाेणार अाहे. एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी गुरुवारी काढलेल्या परिपत्रकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन १ नाेव्हेंबरला करण्याचे अादेश सर्व महामंडळाच्या विभागांना आणि आगारांना दिले अाहेत. याचदिवशी वेतनवाढ थकबाकीचे पाचही हप्ते देण्याच्या सूचनाही देण्यात अाल्या अाहेत.

- Advertisement -

थकबाकीच्या रकमेमध्ये वाढीव वेतनवाढ, महागार्इ भत्ता, घरभाडे भत्ता व रजा राेखीकरण यांचा समावेश असेल असे या परिपत्रकात म्हटले अाहे.या वर्षी दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकच्या रकमेतील पाच हप्ते, महागाई भत्ता एकत्र दिल्यामुळे कामगारांमध्ये आनंदचे वातावरण असल्याचे महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले व याचे सम्पूर्ण श्रेय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना जात असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


वाचा: राजधानी दिल्लीत २ मराठी बहिणींची हत्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -