घरमहाराष्ट्रदहीहंडीनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर

दहीहंडीनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर

Subscribe

दहीहंडीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर तसेच जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

गोपाळकाला (दहीहंडीनिमित्त) येत्या सोमवारी, ३ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर तसेच जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक मंत्रालयासह सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे रविवार पाठोपाठ सोमवारीसुद्धा सलग सुट्टी आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करता येणार आहे.

बॅंकांना सलग सुट्ट्यांची अफवा

रविवार ते बुधवार बॅंका बंद राहणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवार आणि सोमवार सलग सुट्ट्या आल्यानंतर ४ आणि ५ सप्टेंबर रोजी बॅंकेचे कर्मचारी संपावर जात असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र हा संप रिझर्व्ह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचा असल्याचे समोर येत आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामधील तब्बल १८ हजार कर्मचारी ४ आणि ५ तारखेला संपावर जाणार आहेत. त्यामुळे बॅंकेची कोणतीही शाखा बंद राहणार नसून सर्व कामकाज सुरळीत चालणार आहेत हे स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -