घरमहाराष्ट्रदादरच्या सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारू यांची आत्महत्या

दादरच्या सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारू यांची आत्महत्या

Subscribe

साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले दादर येथील सुविधा शोरूमचे (Suvidha Showroom Dadar) संचालक कल्पेश मारू (Kalpesh Maru) यांचा मृतदेह सापडला आहे. वसई येथे त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिड डे या इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. कल्पेश यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार असून त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्पेश मारू हे सोमवारपासून बेपत्ता होते. दरम्यान, वसई येथील राजू साळवी यांच्या गुरुवारी फार्महाऊसवर त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे राजू साळवी यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. कल्पेश मारू यांच्याजवळ आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. त्यानुसार वसई पोलिसांनी दादर पोलिसांना कळवले आणि मारू यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

- Advertisement -

कल्पेश मारू यांना मानसिक आजार होता. त्यांनी याआधीही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. ते १५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्यामुळे गुरुवारपर्यंत वाट पाहून आम्ही पोलीस तक्रार करणारच होतो. मात्र त्याआधीच त्यांचा मृतदेह सापडला अशी बातमी आली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.

साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले सुविधा हे शोरूम मारू कुटुंबातील चार भाऊ मिळून चालवतात. तसंच, या कुटुंबीयांचा बांधकाम व्यवसायही आहे. कल्पेश मारू यांनी याआधीही घर सोडले होते. तेव्हा ते रजास्थान आणि नंतर गुजरातमध्ये सापडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -