घरदेश-विदेशदेशात कोरोना रुग्णसंख्येत घट; महाराष्ट्रात ५ बाधितांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट; महाराष्ट्रात ५ बाधितांचा मृत्यू

Subscribe

गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी एकूण २,४८२ रूग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३६ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

देशभरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असून मागील काही आठवड्यांमध्ये देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण १३,२७२ नव्या रूग्णांची वाढ झाली असून गुरूवारच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या कमी झाली आहे. गुरूवारी देशभरात १५, ७५४ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

गेल्या २४ तासांत ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी एकूण २,४८२ रूग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३६ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

- Advertisement -

देशात ४००० पेक्षा जास्त रूग्ण कोरोनामुक्त

- Advertisement -

देशात सध्या कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३,९०० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशात कोरोनाची सुरूवात झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण ४,३६,९९,४३५ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत देशभरात एकूण २०९ कोटींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पार पडले आहे.

महाराष्ट्रामध्ये ५ कोरोना रूग्णांचा मृत्यू
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांत २२८५ या नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. तर यांपैकी ५ रूग्णांचा मृत्यू झाला असून २२३७ रूग्ण बरे झाले आहेत.

 

 

हेही वाचा :जन्माष्टमी उत्सवादरम्यान मथुरेत गालबोट, चेंगराचेंगरीत दोन भाविकांचा मृत्यू

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -