घरमहाराष्ट्र‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ !!

‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ !!

Subscribe

वैभव राऊत समर्थनार्थ आज ( शुक्रवारी ) नालासोपाऱ्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ७ ते ८ हजार लोक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ अशा घोषणा दिल्या गेल्या.

‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत नालासोपाऱ्यामध्ये! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा वैभव राऊत कोण? नालासोपारामध्ये गुरूवारी ( ९ ऑगस्ट ) एटीएसनं ज्याच्या घरातून स्फोटकं आणि ८ गावठी बॉम्ब जप्त केले तोच हा वैभव राऊत. त्याच वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारामध्ये आज ( शुक्रवारी ) मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये ७ ते ८ हजार नागरिक सहभागी झाले होते हे देखील विशेष. यावेळी ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ अशा घोषणा दिल्या गेल्या. पालघरपासून हजारोंच्या संख्येनं नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाची पूर्व कल्पना असल्याने पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अनेकांना प्रतिबंधात्मक नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. शिवाय, मोर्चातील प्रत्येक हालचालीवर पोलीस देखील लक्ष ठेवून होते.

वाचा – मुंबई एटीएसच्या कारवाईत वैभव राऊतनंतर आणखी दोघांना अटक

कोण आहे वैभव राऊत

९ ऑगस्ट रोजी ( गुरूवारी ) एटीएसनं नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून स्फोटकं जप्त केली होती. राज्यातील काही भागांमध्ये स्फोट घडवण्यासाठी ही स्फोटकं गोळा केल्याचा आरोप वैभव राऊतवर आहे. वैभव व्यतिरीक्त नालासोपाऱ्यातील २५ वर्षीय शरद कळसकर आणि पुण्यातील ३९ वर्षीय सुधनवा गोंधळेकर याला देखील अटक करण्यात आली. दरम्यान या तिनही आरोपींना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एटीएस वैभवच्या हालचालींवर नजर ठेवून होते. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही. तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

- Advertisement -
वाचा – वैभव राऊतची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट २’ असण्याची शक्यता

१९९३ नंतर पहिल्यांदाच प्रचंड आरडीएक्स सापडले

१९९३ नंतर पहिल्यादाच मुंबईत आरडीएक्स सापडले आहे. हे आरडीएक्स प्रचंड क्षमतेचे विस्फोटक असल्याचं मानलं जातं. लोकल भाषेत याला काला साबून, असं म्हणतात. हे आरडीएक्स कसं नालासोपारापर्यंत पोचलं याचा एटीएस तपास घेत आहेत.

वाचा – वैभव राऊत सनातचा नाही; सनातनच्या वकीलांचा खुलासा

वाचा – वैभव राऊतचा सनातनशी संबंध तपासानंतरच कळेल – दीपक केसरकर

जप्त केलेले साहित्य 

  • जिलेटिनच्या काड्या २
  • इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स ४
  • नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स २२
  • सुरक्षा फ्यूजच्या तारा
  • न्यूज पेपरमध्ये गुंडाळलेले व्हाईट पाउडर स्टिक
  • प्रत्येकी एक लिटरची विषाने भरलेली बाटली २
  • ६ वोल्ट क्षमतेच्या १० बॅटरी असलेला बॉक्स १
  • कटर आणि ब्लेड्स
  • खांद्यावरील यंत्र आणि उपकरणे
  • स्विचेस ३
  • विशिष्ट प्रकारचे सर्किट्स (१ पूर्ण २ अपूर्ण) ३
  • बॅटरी कनेक्टर्स
  • बॅटरी कन्टेनर्स २
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -