घरमुंबईवैभव राऊतची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' असण्याची शक्यता

वैभव राऊतची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट २’ असण्याची शक्यता

Subscribe

एटीएसने नालासोपारा येथे केलेल्या धडक कारवाईमध्ये 'हिंदू जनजागृती समिती'चा साधक वैभव राऊत याच्या घरातून आठ गावठी बॉम्ब जप्त केले. यावर वैभव याची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' अशी टीका या समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. या अटकेवर घनवट यांनी एक आरोपपत्र जाहीर केले आहे.

एटीएसने नालासोपारा येथे केलेल्या धडक कारवाईमध्ये ‘हिंदू जनजागृती समिती’चा साधक वैभव राऊत याच्या घरातून आठ गावठी बॉम्ब जप्त केले. गुरूवारी मध्यरात्रीपासून या ठिकाणी एटीएसकडून सकाळपर्यंत हा तपास सुरू होता. एटीएसकडून वैभव राऊत याला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान वैभव राऊत याला एटीएसकडून ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता हिंदू जनजागृती समितीकडूनसुद्धा आरोप करण्यात येत आहेत. वैभव राऊत याची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट २’ अशी टीका ‘हिंदू जनजागृती समिती’चे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. या अटकेवर घनवट यांनी एक आरोपपत्र जाहीर केले आहे.

वाचा ः वैभव राऊत सनातचा नाही; सनातनच्या वकीलांचा खुलासा

वैभव  हा गोवंश रक्षक 

वैभव राऊत हा हिंदु जनजागृती समितीच्या सर्व हिन्दू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदुसंघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत होता मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता. वैभव हा धडाडीचा गोवंश रक्षक असून तो हिंदू जनजागृती गोवंश रक्षा या संघटनेतून कार्यरत असल्याची माहितीदेखील या परिपत्रकात देण्यात आली आहे. या घटननेनंतर सनातन संस्था पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आल्या असल्याने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा ः नालासोपाऱ्यात आठ देशी बॉम्ब हस्तगत; मुंबई एटीएसची कारवाई

त्याचा समितीतील सहभाग कमी झाला

वैभव राऊत हा हिंदू जनजागृतीच्या अनेक संघटनांच्या माध्यमातून काम करत होता. अनेक आंदोलनामध्ये सहभागी होता मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आमच्यामध्ये सक्रिय नसल्याने, त्याने कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला नाही, असा खुलासा हिंदू जनजागृती समिती तर्फे करण्यात आला आहे.

वाचा ः नालासोपाऱ्यातील घटनेवरून सनातनच्या दहशतवादी कारवाया स्पष्ट – नवाब मलिक

आज कोर्टातसमोर सुनावणी 

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झाले आहे. दरम्यान, या अटकेनंतर हिंदू जनजागृती समितीतर्फे जरी हा खुलासा करण्यात आला असला तरी वैभव राऊत याला आज कोर्टात हजर करण्यात येणार असून त्या मागे काय कट होता याचा खुलासा होतो का, हे पाहणे महत्वाचे आहे.

- Advertisement -

 


काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे ट्विट  

एकीकडे वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक नसल्याचे स्पष्टीकरण सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी दिले असताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून वैभव हा सनातनचाच साधक असल्याचा पुरावा एका छायाचित्रातून दिला आहे. राज्यातील बहुतांश पत्रकार परिषदांमध्ये सनातन संस्थेच्या व्यासपीठावर वैभवची उपस्थिती होती. याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -