घरमुंबईनायर रुग्णालयातील 'ह्युमन मिल्क बँक' नवजात बाळांसाठी वरदान

नायर रुग्णालयातील ‘ह्युमन मिल्क बँक’ नवजात बाळांसाठी वरदान

Subscribe

अनेकदा माता आपल्या नवजात बाळाला दूध पाजण्यास असमर्थ असते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शीव आणि केईएम रुग्णालयानंतर नायर रुग्णालयातही नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी (एचएमबी) सुरू करण्यात आली होती. नायर रुग्णालयातील मातृदुग्ध पेढीला १४ ऑगस्ट या दिवशी सहा महिने पूर्ण झाले आहेत. नायर हॉस्पिटलमधील मानवी दूध बँकेत आतापर्यंत २०० हून अधिक मातांनी स्वेच्छेने हॉस्पिटलमध्ये दुध दान केले आहे. ज्याचा फायदा जवळपास रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये दाखल झालेल्या १०५ नवजात बाळांना झाला आहे. तसेच, त्यापैकी सुमारे ९७ टक्के बाळांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

या ह्युमन मिल्क बँकेत आतापर्यंत ९४ लीटर दूध संकलन करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात रुग्णालयात १४ लिटर पासून ते २५ लिटरपर्यंत संकलन वाढले असल्याचेही रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. तसेच, दररोज सरासरी ७५० मि.ली. मानवी दुधाचे संकलन केले जात आहे. अशा ह्यूमन मिल्क बँकांच्या फायद्यांविषयी आणि गरजांबद्दल बोलताना डॉ. सुषमा मलिक, प्राध्यापक आणि मुख्याधिकारी, बालरोग विभागाचे प्रभारी आणि एचएमबीचे प्रभारी यांनी सांगितले की, “ह्युमन मिल्क बँक ही खरंतर आजच्या काळाजी गरज आहे. अनेकदा महिलेची प्रसूती झाल्यानंतर अवघ्या काही तासातच बाळाला दूध पाजावे लागते. स्तनपान सर्वोत्तम, सुरक्षित, नैसर्गिक, सर्वश्रेष्ठ इम्युनोलॉजिक, सहजपणे उपलब्ध होणारे आणि बाळासाठी पोषण असणारे एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. स्तनपान हे बाळाला सर्वोत्तम पोषण देते. तसेच ह्युमन मिल्क बँकेत संकलन होणारे दूध ही बाळाला दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे. ज्या बाळाला प्रत्यक्ष माता स्तनपान करु शकत नाही, अशा बाळांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.”

- Advertisement -

तसेच, या ह्युमन मिल्क बँकेला म्हणजेच एमएचबीला १४ ऑगस्ट या दिवशी ६ महिने पूर्ण झाले आहेत. या मिल्क बँकेतून दिवसाला जवळपास ५ बाळांना दूध पाजले जाते. प्रि-म्यच्युअर बाळ, कमी वजन असलेले बाळ, आजारपणामुळे माता एमआयसीयूमध्ये दाखल असलेल्या किंवा प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू झालेल्या किंवा बाळाची प्रकृती ठिक नसलेल्या अशा बाळांना या ह्युमन मिल्क बँकेतून मातेच्या दूधाची सुविधा उपलब्ध केली जाते.

शिवाय, ज्या मातेने नुकताच बाळाला जन्म दिला असेल त्याच मातेचे दूध या मिल्क बँकेत दान केले जाते.  शिवाय, ज्या मातेचे बाळ आजारपणामुळे एनआयसीयूमध्ये दाखल असेल. तसेच, जी माता ओपीडीतील बाळांना स्तनपान करत असेल अशा मातांकडूनच दूधाचे दान केले जाते. एक माता जवळपास दिवसातून ३ ते ४ वेळा स्तनपान करते. एक माता आपल्या मुलांना स्तनपान करते तोपर्यंत ती दान देखील करु शकते. मातांना हे स्वेच्छेने दान करावे लागते. माता स्तनपान करण्याआधी त्यांच्या क्लिनिकली चाचण्या, तपासण्या केल्या जातात. शिवाय, त्यांच्या संमतीनेच ही सर्व प्रक्रिया केली जाते, असेही डॉ. मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दूधाअभावी एवढ्या बालकांचा मृत्यू

मातेचे दूध न मिळाल्यामुळे जगात १३ लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबवली जाते. जगभरात ५१७ मातृदुग्ध पेढ्या कार्यरत असून देशात १३ मातृदुग्ध पेढ्या आहेत. यात, मुंबईतील जेजे, शीव रुग्णालय, राजावाडी, केईएम आणि नायर रुग्णालयात मातृदुग्ध पेढी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ शकत नाहीत, अशा बाळांना आपल्याच मातेचे किंवा मातृदुग्ध पेढीतले दुध सर्वात उत्तम आहे.

अशी असते प्रक्रिया

विशेषतः ज्या बाळांची आई दुध देण्याजोगी असते, त्या बाळांना दुध मिळतच. पण, आई नसलेल्या किंवा आईची प्रकृती ठिक नसलेल्या बाळांना दूध मिळत नाही. अशा बाळांना गायीचे दूध किंवा दुधाची पावडर वापरली जाते. हे दुध चांगले उकळवले जाते. त्यानंतरच दुध थंड करून बाळाला पाजले जाते. या बाळांना दिवसभरात तीन-चार वेळा दुधाची गरज भासते. मातृदुग्ध पेढीत अन्य गर्भवती मातांकडून दुध घेऊन ते संकलित केलं जातं. या दुधाची तपासणी, प्रक्रिया केल्यानंतर गरजू नवजात बालकांना दिलं जातं. हे दुध अशा बालकांसाठी वापरले जाते ज्यांचे या मातांशी कुठलंही नाते संबंध नसतात.

या माता करु शकतात दान

  • ज्या मातांना अतिरिक्त दूध येतं
  • ज्या मातेला कुठलाही आजार नाही
  • अकाली जन्माला आलेल्या बाळांच्या माता
  • माता ज्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -