घरमहाराष्ट्रSupriya Sule: कुणी सोडून गेल्याने काहीही फरक पडत नाही; सुळेंचा घणाघात

Supriya Sule: कुणी सोडून गेल्याने काहीही फरक पडत नाही; सुळेंचा घणाघात

Subscribe

मुंबई: प्रेमाच्या नात्यात व्यवहार आणि हिशेब नसतो. त्यामुळे प्रेमाचं नात खूप कमी लोकांना समजतं. प्रेमाची नाती जपायची असतात. नाती जपायला जास्त ताकद लागते, तोडायला फार हिंमत लागत नाही. कुणी पक्ष सोडून गेल्याने काही फरक पडत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. मुंबईत राष्ट्रवादी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे.(Supriya Sule It doesn t matter if someone leaves Congestion of Supriya Sule)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आठ वर्षांपूर्वी आम्ही निवडणूक रोख्यांना विरोध केला होता. मात्र, भाजपाने आमच्यावर तेव्हा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. मी आज सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानतो. न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी घातली आहे. आज सर्वांत जास्त निवडणूक रोखे हे भाजपाकडे आहेत. निवडणूक रोख्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे. या निवडणूक रोख्यांचा तपास झाला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयच म्हणत आहे की, यात भ्रष्टाचार झालेला असू शकतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

यंदा भाऊबीज नाही, बहिणीबीज साजरी करू..!

सरकार सत्तेत आल्यापासून आश्वासनांच्या नुसत्याच गप्पा मारतंय, पण आशा भगिनींच्या हाती काहीच लागलेलं नाही. जे सरकार या भगिनींसाठी काही करत नाही, असं हे सरकार निरुपयोगी भावासारखंच आहे. नुसत्या आश्वासनांनी सत्ता मिळत नाही, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. यंदा भाऊबीज नाही, बहिणीबीज साजरी करू, असू सुळे म्हणाल्या.

पेटीएममध्ये 27 हजार कोटींचा घोटाळा

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुसरा सर्वात मोठा विषय हा पेटीएमचा आहे. देशातला सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हे मी नव्हे, तर केंद्र सरकारचं म्हणत आहे. नोटंबदी करण्यात आली. सगळ्या नोटा गेल्या असा दावा केला जातो. मग तुम्ही धाड टाकता तेव्हा ते पैसे कुठून येतात. देशातील पैसे कोणीतरी वेगळंच छापत आहे का? डिजिटल पेमेंट आणण्यात आलं. यामुळे कोणीही भ्रष्टाचार करू शकणार नाही, असा दावा करण्यात आला. मात्र, सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हा भ्रष्टाचार 27 हजार कोटी रुपयांचा आहे. हे माझं मत नाहीये. मी या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या आहेत. याच पेटीएममध्ये चीनकडून गुंतवणूक करण्यात आली, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला.

- Advertisement -

10 वर्षांपूर्वी कोणालाही ईडी माहिती नव्हती. आता गावागावत ईडी काय आहे, हे समजले आहे. आज शेबंडं पोर पण म्हणत की, ते पक्षातून गेले ते ईडीमुळे गेले का? तर मी काही उत्तर देत नाही. मला काय यात पडायचं नाही, अशी टिप्पणीदेखील सुप्रिया सुळेंनी केली.

(हेही वाचा: Central Railway : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान लवकरच ‘चिखलोली’ स्थानक; प्रवाशांना दिलासा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -