घरमहाराष्ट्रयूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा पण जागा खाली नाहीये - सुशीलकुमार शिंदे

यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा पण जागा खाली नाहीये – सुशीलकुमार शिंदे

Subscribe

यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यूपीएच्या अध्यक्षपदावर भाष्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी युवक आघाडीने याबाबत ठराव देखील केला आहे. अशात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं आहे. यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

पुण्यात राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना यूपीए अध्यक्षपदासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देताना यूपीएच्या अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. दरम्यान, त्यांनी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांच्या शरद पवार यांच्याविषयीच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं.

- Advertisement -

सुशीलकुमार शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या जाती धर्माच्या राजकारणावर भाष्य केलं. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी बोलताना पुन्हा पुन्हा जाती धर्माचे राजकारण चालणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. तसंच, त्यांनी आम्ही जो काळ अनुभवला आहे, त्यावेळी संयम होता. मात्र परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -