घरताज्या घडामोडीमनसेच्या 'त्या' पत्रावर किशोरी पेडणेकर भडकल्या, म्हणाल्या राज ठाकरे...

मनसेच्या ‘त्या’ पत्रावर किशोरी पेडणेकर भडकल्या, म्हणाल्या राज ठाकरे…

Subscribe

काही दिवसांपूर्वी मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेली हनुमान चालिसा रथ यात्रा रद्द करण्यात आली. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना भवनच्यासमोर हनुमान चालीसा लावली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेनं पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी शिवसेना भवनमधील भवानी मातेच्या मंदिरात मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

खरंतर ही मोठी स्टंटबाजी

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्या पत्रावर संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या सहकुटूंब आणि सहपरिवारासह आरती करायला परवानगी द्या असे पत्र लिहा, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. सेनाभवनामध्ये आरती करण्यास परवानगी द्या, असं पत्र मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. खरंतर ही मोठी स्टंटबाजी आहे. महाराष्ट्रात कुठेतरी वादंगाचा विषय निर्माण करून ठेवायचा. कोणाची तरी सुपारी घेऊन बोलायचं. त्यामुळे अशा पद्धतीने वागणं बरोबर नाहीये. बाळासाहेब यांचं उत्तरदायीत्व हे उद्धव ठाकरे आहेत. राज ठाकरेंच्या सहकुटूंब आणि सहपरिवारासह आरती करायला परवानगी द्या असे पत्र लिहा, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

नेमकं काय म्हटलंय पत्रात ?

सन्माननीय उद्धवजी साहेब रविवारी रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र सैनिकांनी हनुमान चालिसा रथ यात्रेचे आयोजन केले होते याचा शुभारंभ मंदिरा प्रमाणे असणाऱ्या शिवसेना भवन इथून करण्यात आला. मात्र यावर सरकारने ती रथ यात्रा रद्द करत उलट आमच्यावर कारवाईचा बडगा उचलला. सदर रथ श्रीराम उत्सवाच्या ठिकाणी तसेच राम मंदिराच्या ठिकाणी लावला जाणार होता.

ज्यापद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंवर अत्याचार झाले तसेच अत्याचार राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय? आम्ही सुद्धा हिंदू आहोत सेना भवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात मग हनुमान चालीसा लावली तर इतका द्वेष का अस आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेणासे झालेय.

- Advertisement -

तुम्ही तुमच्या भाषणातून अनेकवेळा आम्ही जनतेच्या हितासाठी हिंदुत्वसाठी महाविकास आघाडी बरोबर एकत्र आलो असल्याचे वक्तव्य केलेत. आमचा मुद्दा एकच जर तुम्ही हिंदुत्वसाठी एकत्र आलात तर मग मनसैनिकांनी हनुमान चालीसा वाजवील्यावर तुम्हाला कारवाई का करावीशी वाटली? जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग सतत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे का बोलावे लागते याचे उत्तर आपण द्याल का?

आमचा कुठल्याही धर्माबद्दल अथवा त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही मात्र ते ज्या पद्धतीने एकतर्फी कारवाई होत आहे, त्या पद्धतीला विरोध आहे. एरव्ही आम्ही रमजानच्या दिवसात मुस्लिम बांधवांच्या घरी जातो तसेच गणेशोत्सवात ते आमच्या घरी येतात.

मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही अशी टीका टिपणी आदित्य यांनी केली मग पक्ष संपलेला असेल तर तुम्हांला कारवाईचा आधार का घ्यावा लागतो मनसेच्या वसंत मोरे यांना फोन का करावा लागतो गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या मित्राच्या फोनवरून मला पक्षात येण्यासाठी फोन करण्याची गरज का भासली. करोडो रुपये खर्च करून नगरसेवक का पळवावे लागतात.

मनसेची स्थापना झाल्यापासून १६ वर्षे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी, दुष्काळ, भ्रष्टाचार यावर ओरडेत होते, तेव्हा आपण मनावर घेतले नाही आणि एक भाषण थोडे वेगळे काय केले (त्यातही ते मुद्दे बोलेले होते) लगेच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना ब्लू प्रिंट, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आठवावे लागले.

शिवसेनेतील नेते मंडळी समाज माध्यमाच्या माध्यमातून सेना भवन मध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरा समोर आरती करण्याचा सल्ला देतात. केवळ म्हणूनच मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करतो की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सेना भवन मधील भवानी मातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी.


हेही वाचा : अज्ञातवासात असलेल्या सोमय्यांनी व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारला दिला पुन्हा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -