घरताज्या घडामोडीThe Kashmir Files चित्रपट न पाहण्याचे कारण सांगताना सोनू निगमने केजरीवालांवर साधला...

The Kashmir Files चित्रपट न पाहण्याचे कारण सांगताना सोनू निगमने केजरीवालांवर साधला निशाणा

Subscribe

काश्मिर पंडितांवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नेहमीच चर्चेत असतो. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जोरदार कमाई अजूनही सुरू आहे. प्रत्येक जण ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी बोलत आहे. परंतु असे बरेच जण आहेत, त्यांनी अजूनही ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिला नाही. या यादीत बॉलिवूडचा गायक सोनू निगम याचे देखील नाव सामील आहे. सोनू निगमने एका मुलाखतीमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ न पाहण्याचे कारण सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चित्रपटासंदर्भातील केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियासोबतच्या मुलाखतीमध्ये सोनू निगमने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट न पाहण्यामागचे कारण सांगितले आहे. सोनू म्हणाला की, ‘जेव्हा मी ती कहाणी ऐकतो, तेव्ही मी मनातून खूप रडतो. ही फक्त काश्मिरची गोष्ट नाही. मी हा चित्रपट पाहण्याची हिंमत करू शकत नाही.’

- Advertisement -

केजरीवालांनी केलेल्या विधानावर सोनू काय म्हणाला?

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, ‘हा चित्रपट फेक आहे आणि हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यापेक्षा विवेक अग्निहोत्री यांना तो यूट्यूबवर टाकण्यास सांगावे. त्यामुळे तो सगळ्यांसाठी फ्री होईल आणि त्याला सर्व जण पाहू शकतील.’ याबाबत सोनू निगम म्हणाला की, टकेजरीवालांची ही प्रतिक्रिया सर्व पंडित कुटुंबियांचा अपमान आहे.’


हेही वाचा – KGF 2 चित्रपटाच्या यशासाठी रॉकीच देवाकडं साकडं


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -