घरमहाराष्ट्र'तरुण भारत' अग्रलेखातून पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका

‘तरुण भारत’ अग्रलेखातून पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका

Subscribe

नागपूर तरुण भारत वृत्तातील अग्रलेखातून पुन्हा एकदा शिवसेना नेता संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

नागपूर तरुण भारत वृत्तातील अग्रलेखातून पुन्हा एकदा शिवसेना नेता संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. कालच्या अग्रलेखावर राऊत यांनी दिलेल्या उत्तराला अनुसरून आजच्या अग्रलेखात त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका केली आहेत. तसेच तभा म्हणजे तरुण भारत हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. राष्ट्रीय बाण्याच्या ‘तरुण भारता’चं स्थान कधीही ढळणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तर असा उल्लेख करुन संजय राऊत यांच्या सोमवारच्या वक्तव्याचा समाचार तरुण भारतच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. अधू दृष्टीचा असा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.

काल वृत्तपत्रातून बेताल उद्धव हा अग्रलेख लिहून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला होता. ज्याप्रमाणे सामनातून भाजपावर टीका केली जाते त्याच धाटणीची ही टीका होती. याबाबत जेव्हा संजय राऊत यांना विचारण्यात आले तेव्हा तरुण भारत असा कोणता पेपर आहे का? मला ठाऊक नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार आजच्या नागपूर तरुण भारतच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, 

  • राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून जर आपल्याला नागपूरचा ९३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला ‘तरुण भारत’ माहिती नसेल, तर आपल्याला प्रवक्ता म्हणून नेमणार्‍या नेत्याचा आपण अपमान करतोय, याचे तरी किमान भान त्यांनी ठेवले पाहिजे.
  • प्रत्येक वेळी पक्ष प्रमुखांना अडचणीत आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे की काय, अशी शंका अधिक दृढ व्हावी, असेच त्यांचे वागणे दिसते आहे.
  • तरुण भारत माहिती नसेल तर मग यांना ग. त्र्यं. माडखोलकर माहिती असण्याचा प्रश्र्नच निर्माण होत नाही.
  • कालच्या अग्रलेखात आम्ही तीन प्रश्न उपस्थित केले होते. एक शिवसेनेच्या शेतकर्‍यांप्रतीच्या प्रेमाचा, दुसरा राम मंदिराचा आणि तिसरा मराठी बाण्याचा.
  • आज चौथा प्रश्न उपस्थित करतोय, संयुक्त महाराष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या भूमिकेचा. ग. त्र्यं. माडखोलकर हे किमान त्या भूमिकेसाठी तरी धृतराष्ट्राला ठाऊक असतील, असे आम्हाला कालपर्यंत वाटत होते. पण, सत्तेच्या हव्यासापोटी आता संयुक्त महाराष्ट्राच्या भावनेलाही तिलांजली द्यायला तुम्ही निघालात काय, असा प्रश्न आम्ही त्यांना थेट विचारत आहोत.

हेही वाचा –

राज्यात खिचडी पकतेय : CM सेना, DCM राष्ट्रवादी तर Speaker काँग्रेस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -