घरमहाराष्ट्रराज्यात खिचडी पकतेय : CM सेना, DCM राष्ट्रवादी तर Speaker काँग्रेस!

राज्यात खिचडी पकतेय : CM सेना, DCM राष्ट्रवादी तर Speaker काँग्रेस!

Subscribe

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरीही सत्ता स्थापनेची कोंडी काही फुटताना दिसत नाही. त्यामुळेच राज्यात आता एक समीकरण जुळून आल्याचे खात्रीलायक समजते.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरीही सत्ता स्थापनेची कोंडी काही फुटताना दिसत नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करताना शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही. त्यामुळेच राज्यात आता एक समीकरण जुळून आल्याचे खात्रीलायक समजते. या नव्या समीकरणानुसार भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करेल आणि त्याला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, याबाबतच्या रणनितीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. या नव्या समीकरणानुसार मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी-काँग्रेसकडे तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देता येऊ शकते, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आणि माजी मुख्यमंत्र्याने दिल्ली झालेल्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ‘आपलं महानगर’ला दिली.

तर भाजपला पाठिंबा देणारे अपक्षही सेनेकडे येतील

सध्या शिवसेनेकडे ५६ आमदार, राष्ट्रवादीकडे ५४ आणि आमचे ४४ आमदार असे मिळून १५४ आमदारांचे पाठबळ आहे. त्याशिवाय शिवसेनेला ८ अपक्ष आमदारांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना सत्ता स्थापन करते म्हटल्यावर ज्या अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, ते अपक्षही सेनेकडे येतील आणि हे संख्याबळ १६२ वरून १७२ पर्यंत जाईल, असा दावाही या नेत्याने केला आहे. मात्र एकीकडे सत्ता समीकरणाच्या बैठका सुरु असताना शिवसेनेने भाजपसोबतची साथ सोडल्याचे अगोदर जाहीर करावे, त्यानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी उघडपणे आपली भूमिका जाहीर करेल, असेही या नेत्याने सांगितले.

- Advertisement -

१९९५ च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद तर उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे होते. तसाच फॉर्म्युला यावेळेला राज्यात अंमलात येऊ शकतो. ज्यानुसार मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी-काँग्रेसकडे आणि बाहेरून पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद देता येऊ शकेल. याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरु असल्याचा दुजोरा राष्ट्रवादी-काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने ‘आपंल महानगर’ला दिला.

शरद पवारांनी सस्पेन्स वाढवला 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल, सोमवारी संध्याकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांना अवगत केले. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मतदारांनी सत्ता स्थापनेचा कौल भाजप आणि शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा अधिकार सर्व प्रथम त्यांना आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसला मिळालेला कौल हा विरोध पक्षात बसण्यासारखा असला तरीही राजकीय भविष्यात काय होईल, याबाबत कोणीही सांगू शकत नाही, असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे. आपण आज, मंगळवारी मुंबईत परतत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून पुन्हा दोन दिवसांनी सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवसेना युती तोडण्याच्या मार्गावर?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज, मंगळवारी ओला दुष्काळ पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होण्याची शक्यता धूसर आहे. त्यातच शिवसेनेच्या आमदारांकडून भाजपसोबतची युती तोडण्याबाबत कमालीचा दबाव उद्धव ठाकरे यांच्यावरती वाढत असून कोणत्याही परिस्थितीत राज्यात भाजपला रोखण्याची आणि शिवसेनेला मुख्यमंत्री बनवण्याची हिच ती वेळ असल्याचे सेनेचे आमदरा सांगत आहेत. त्यामुळे मागील पाच वर्ष तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणाऱ्या शिवसेनेसमोर आता भाजपची साथ सोडण्याचाच एक पर्याय दिसत आहे, असे एका ज्येष्ठ नेता आणि कॅबिनेट मंत्र्याने पडद्यामागे सुरु असलेल्या हालाचलीबाबत सांगताना म्हटले आहे.

१२ दिवस होऊनही तसेच केंद्रात व राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपचे चाणक्य समजले जाणारे अध्यक्ष अमित शहा कुठे आहेत?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषदेत वारंवार विचारत आहेत. गोवा आणि कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे आमदारांचे संख्याबळ नसतानाही अमित शहा यांनी सत्तेचे गणित जुळवून आणले होते. मग महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याबाबत अमित शहा का गप्प आहेत, असे राऊत वारंवार विचारतात. मात्र त्याला भाजपकडून कुणीच उत्तर देत नसल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे शिवसेनाही आता युती तोडण्याच्या मनस्थितीपर्यंत आल्याचे या नेत्याने सांगितले आहे.

हेही वाचा –

‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’; मातोश्रीच्या अंगणात पोस्टरबाजी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -