घरदेश-विदेशरानू मंडलच्या 'या' वागणूकीवर चाहते नाराज; व्हिडीओ व्हायरल

रानू मंडलच्या ‘या’ वागणूकीवर चाहते नाराज; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

या व्हिडीओतील रानूच्या वागणूकीमुळे चाहते तिच्यावर टिका करत आहेत. रानूची वागणूक निंदनीय असल्याची टिका काही नेटकऱ्यांनी केली आहे.

रेल्वे स्टेशनवर गाणे गाणारी रानू मंडल एका व्हायरल व्हिडीओमुळे रातोरात स्टार झाली. पण आता एका व्हायरल व्हिडीओमुळे रानू मंडलचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. या व्हिडीओतील रानूच्या वागणूकीमुळे चाहते तिच्यावर टिका करत आहेत. रानूची वागणूक निंदनीय असल्याची टिका काही नेटकऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

सध्या रानूचा एक व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते तिच्यावर टिका करत आहेत. एका सुपरमार्केमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या रानू मंडल यांच्याकडे तेथील एका महिला चाहतीने सेल्फीसाठी विचारणा केली. यावेळी महिला चाहतीने रानू मंडल यांच्या हाताला स्पर्श करत रानूकडे सेल्फीसाठी विनंती करताना दिसते. तिच्या या वागण्याचा राग येऊन रानू मंडल तिच्यावर रागवल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. तुम्ही अशाप्रकारे माझा हात का पकडला, म्हणून रानूने त्या महिलेला राग भरला. यावर ती महिला चाहती रानूकडे केवळ हसत पाहत राहिली.

नेटकऱ्यांकडून होतेय टिका

या व्हायरल व्हिडीओतील रानूच्या वागणूकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला जे स्थान मिळाले आहे, त्याचा आदर केला पाहिजे, असे नेटकऱ्यांनी रानू मंडलला सुनावले आहे. रानूची वागणूक निंदनीय असल्याची टिका काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर माणसाने आपले मूळ विसरु नये, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -