घरताज्या घडामोडीTata Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनमध्ये अबाल-वृद्धांचा उत्साह; हाफ मॅरेथॉनचे तीनही विजेते...

Tata Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनमध्ये अबाल-वृद्धांचा उत्साह; हाफ मॅरेथॉनचे तीनही विजेते सैन्यदलातील

Subscribe

Tata Mumbai Marathon  मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन आज (21 जानेवारी) रविवारी झाली. या मॅरेथॉनसाठी मुंबई नटली होती. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू सहभागी झाले होते. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्टपटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे. हौशी आणि ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉनमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

या मॅरेथॉनमध्ये एकूण 59,515 स्पर्धकांनी भाग घेतला. राज्यपाल रमेश बैस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन विजेते (21.097 किलो मीटर)
प्रथम क्रमांक : सावन बरवाल – 1 तास 5 मिनटे 7 सेकंद

द्वितीय क्रमांक : किरण म्हात्रे – 1 तास 6 मिनटे 23 सेकंद

- Advertisement -

तृतीय क्रमांक : मोहन सैनी – 1 तास 6 मिनटे 55 सेकंद

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे तिघेही भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत.

महिला हाफ मॅरेथॉन विजेते 21.97 किमी
प्रथम क्रमांक : अमरीता पटेल – 1 तास 19 मिनटे 20 सेकंद

द्वितीय क्रमांक : पूनम दिनकर – 1 तास 19 मिनटे 20 सेकंद

तृतीय क्रमांक : कविता यादव – 1 तास 20 मिनटे 45 सेकंद

42.195 किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली होती.

21.097 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे 5 वाजता माहीम रेतीबंदर, माहीम कॉजवे इथून सुरू झाली होती. तर 10 किलो मीटरची मॅरेथॉन सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली.

मुख्य एलिट हौशी मॅरेथॉन सकाळी 7.20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली. त्याचबरोबर 7.22 मिनिटांनी चॅम्पियनशिप विथ डिसॅबिलिटी (विकलांग) ही 1.03 किलोमीटरची मॅरेथॉन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली.

सीनियर सिटीजन रन ही 4.2 किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी 7.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु झाली. सकाळी 8 वाजता ड्रीम रन ही 5.9 किलोमीटरची मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली. या मॅरेथॉनमध्ये अबाल-वृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

हेही वाचा : Mumbai Festival : महाराष्ट्रातील पर्यटन वृद्धीसाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी-गिरीश महाजन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -