घरताज्या घडामोडीतोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता

तौत्के चक्रीवादळामुळे राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी २१ मे रोजी कोकणातील नुकसानीची पाहणी दौरा केला आहे. यावेळी कोकणात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची आढावा बैठकही घेण्यात आली होती. कोकणातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा आणि आता तौत्के चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाल आहे. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रामाणेच मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाई सारखीच मदत दिली जाणार आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना घसघशीत मदत केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. २१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली आहे.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळात केलेली मदत

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला १५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. यावेळी मदत करण्याचे निकषही बदलण्यात आले होते.

  • पक्क्या-कच्च्या घरांचे नुकसानीसाठी मदत – १ लाख ५० हजार रुपये
  • पिकांचे नुकसान – ५० हजार रुपये
  • कमी प्रमाणात घराची पडझड – १५ हजार रुपये मदत
  • कच्चा घरांचे नुकसान – १५ हजार रुपये मदत
  • नष्ट झालेली झोपडी – १५ हजार रुपये
  • लहान-मोठे व्यवसाय नुकसान – १० हजारपर्यंत मदत
  • क्षतीग्रस्त घर – कुटुंबीयांना भांडी व कपडे यासाठी कुटुंबातील प्रत्येकाला ५ हजार मदत
Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -