घरताज्या घडामोडीसाथीचे रोग अन् मुंबईच्या रेल्वे स्टेशनचे १२५ वर्षांचे कनेक्शन

साथीचे रोग अन् मुंबईच्या रेल्वे स्टेशनचे १२५ वर्षांचे कनेक्शन

Subscribe

कोरोनाच्या महामारीने पुन्हा एकदा सांसर्गिक आजार आणि आरोग्य यंत्रणेच्या कमतरता समोर आल्या. सध्याच्या कोरोनाच्या महामारीने आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा समोर आणल्या खऱ्या. पण मुंबईतील अशी अनेक हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिलचे मुंबईत आलेल्या साथीच्या आजाराशी एक कनेक्शन आहे. मुंबईत सव्वाेश वर्षांपूर्वी आलेल्या अशाच एका प्लेगच्या साथीच्या आजारानेही मुंबईतल्या हॉस्पिटलची यंत्रणा कामाला लागली होती. या साथीच्या आजारामध्ये मुंबईतल्या रेल्वे स्टेशनशी संबंधित असेही नियोजन करण्यात आले होते. या सगळ्या नियोजनामुळेच बॉम्बे प्लेगमधून मुंबईतील नागरिक लढा देऊ शकले होते.

मुंबईत १८९६ मध्ये प्लेगच्या साथीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. या महामारीमध्ये जवळपास ५० टक्के प्रवासी श्रमिकांनी मुंबई सोडली आणि आपआपली राज्ये गाठण्यासाठी सुरूवात केली होती. या प्लेगच्या साथीने इतका कहर केला होता, ज्यामुळे या साथीच्या रोगाला बॉम्‍बे प्‍लेग (Bombay Plague) नावाने ओळखले जाऊ लागले. मुंबईतल्या एका स्थानकावर प्लेगच्या रूग्णांसाठी एक विशेष व्यवस्था होती. या स्टेशनला आणलेले रूग्ण हे स्टेशन नजीकच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले जायचे. महत्वाचे म्हणजे साथीचे रूग्ण येत असल्यानेच या स्थानकावर एक विशिष्ट अशी रचनाही करण्यात आली होती. या साथीच्या रोगाच्या निमित्तानेच या स्टेशनलाही त्या काळात विशेष असे महत्व प्राप्त झाले होते. आता कोरोनाच्या सांसर्गिक आजाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईतले हे हॉस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेत आहेत. त्यामुळे हे स्टेशन आणि हॉस्पिटलचे असे सव्वाशे वर्षाचा इतिहास यानिमित्ताने पुन्हा एकदा ताजा झाला आहे.

- Advertisement -

KASTURBA HOSPITAL

साथीच्या आजाराचे चिंचपोकळी कनेक्शन

चिंचपोकळी ही जुनी गावठाण होती. याठिकाणी गावठाणीच्या आजुबाजुला चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणात होती. चिंचेच्या झाडातील पोकळी म्हणजे चिंचपोकळी म्हणूनच या स्टेशनला चिंचपोकळी असे नाव पडले. मुंबईत १२५ वर्षापूर्वी जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा चिंचपोकळी स्ठेशनवर विशेष एक असे बॅरिकेड तयार करण्यात आले होते. ट्रेन जेव्हा यायची तेव्हा या स्टेशनवर प्रत्येकाची प्लेगच्या साथीसाठी चाचणी करण्यात यायची. या चाचणीमध्ये प्लेग झालेला असला की त्या व्यक्तीला लगेच नजीकच्या अशा कस्तुरबा हॉस्पिटलला पाठवण्यात यायचे. त्यामुळेच कस्तुरबा आणि साथीच्या आजाराचे हे प्लेगच्या निमित्ताने असे कनेक्शन आहे.

- Advertisement -

CHINCHPOKLI STATION

चिंचपोकळी स्थानक हे १८७७ मध्ये उभारले गेले. या परिसरात चिंचेची भरपूर झाडे असल्यानेच या स्टेशनला चिंचपोकळी हे नाव रूढ झाले. १८७७ मध्ये हे स्थानक रेल्वेच्या सेवेत आले होते. मुंबईत १८९६ या कालावधीत प्लेगच्या साथी दरम्यान चिंचपोकळी स्थानकावरून वैद्यकीय सेवेसंदर्भात मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली होती.

Chinchpokli_Station_Banner

आर्थर रोड कारागृहाच्या समोर बांधण्यात आलेले कस्तुरबा रूग्णालय हे साथीच्या आजारांचे रूग्णालय प्लेगसारख्या साथीच्या आजारापासून शहराच्या सेवेत आहेत. प्लेगच्या साथीमध्येही या रूग्णालयाने अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली होती. आता कोरोनाच्या साथीमध्येही हे रूग्णालय आयसोलेशनची सुविधा देण्याचे काम करत आहे. १९२६ पासून मुंबई महापालिकेने हे रूग्णालय चालवण्यासाठीचा ताबा घेतला. तेव्हापासूनच हे रूग्णालय मुंबईकरांच्या सेवेत आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -