घरमहाराष्ट्रप्रवीण चव्हाणांचे स्टिंग मी केले नाही

प्रवीण चव्हाणांचे स्टिंग मी केले नाही

Subscribe

तेजस मोरेने फेटाळले आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासंदर्भात गंभीर आरोप करत 125 तासांचे व्हिडिओ फुटेज पेनड्राईव्हद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. हे सर्व आरोप फेटाळताना प्रवीण चव्हाण यांनी त्यांचा अशिल तेजस मोरे याच्यावर संशयाची सुई वळवली होती. मात्र, माझ्यावर करण्यात आलेला आरोप खोटा असून स्टिंग ऑपरेशनशी माझा काडीचा संबंध नसल्याचे तेजस मोरेने म्हटले आहे.

प्रवीण चव्हाण यांच्या पुण्यातील कार्यालयातून झालेले स्टिंग ऑपरेशन हे भिंतीवरील घडाळ्यातून केल्याचा खुलासा चव्हाण यांनी केला होता. तसेच जेलमध्ये असलेला चव्हाण यांचा अशिल तेजस मोरे याने भेट दिलेल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा बसवलेला असल्याची शक्यताही बोलून दाखवली होती.

- Advertisement -

त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना तेजस मोरेने प्रवीण चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला. प्रवीण चव्हाण यांना मी जुलै 2021 मध्ये भेटलो होतो. एका खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानंतर माझा जामीन करून दिला. त्यानंतर चांगली ओळख झाल्याने मी त्यांच्याकडे जात असे. मी बांधकाम व्यावसायिक होतो. मला जामीन झाल्यानंतर नवीन व्यवसायाच्या शोधात होतो. गिरीश महाजन यांच्या केसमधील फिर्यादी आणि प्रवीण चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून मी काम केले. सरकारी वकील आणि फिर्यादी बोलू शकत नसल्याने चव्हाण मला मेसेज पाठवायचे आणि मी ते फिर्यादीला पाठवायचो, असे तेसज मोरे म्हणाला.

तर, हे स्टिंग ऑपरेशन खरे आहे की खोटे हे स्पष्ट झालेले नाही. या स्टिंगच्या केंद्रस्थानी मी नव्हतो, या आरोपांना काही किंमत नाही. या व्हिडिओत ओव्हर लॅपिंग आणि लिप मिक्सींग करण्यासाठी वेळ घेण्यात आला आणि व्हिडिओ सभागृहात देण्यात आले, असा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -