घरमहाराष्ट्रराज्यातील 'या' शहरांमध्ये उबदार थंडीचा कडाका

राज्यातील ‘या’ शहरांमध्ये उबदार थंडीचा कडाका

Subscribe

ऊन्हामुळे हैराण झालेले मुंबईकर मात्र थंडीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

जसजसा नोव्हेंबर महिना सरु लागला आहे तसतसा राज्यामध्ये थंडीचा जोर वाढू लागला. मुंबई वगळता राज्यातील अन्य काही शहरांमध्ये लोकांना थंडीची ऊब जाणवू लागली आहे. यामध्ये निफाड आणि अहमदनगरचा प्रामुख्याने सहभाग असून, तिथल्या हवेमध्ये गारवा वाढतो आहे. बुधवारी सकाळी निफाडमध्ये तापमानाचा पारा १०.६ सेल्सिअस अंशांपर्यंत खाली गेला होता. हवामान खात्याच्या अंदानुसार येत्या काही दिवसांत हा पारा अाणखीन खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे. तापमानात अचानक झालेल्या या बदलामुळे गेल्या काही महिन्यांपासून गरमीने त्रस्त असलेले नागरिक सुखावले आहेत. मात्र, सध्या राज्यात तापमानाचा पारा सर्वात खाली गेलेलं शहर आहे नाशिक. नाशिकमध्ये दोन दिवसांपासून तापमानाचा पारा १० अशं सेल्सिअसवर गेला आहे. एकाएकी वाढलेल्या या थंडीमुळे नाशिककर सुखावले आहेत.


वाचा: नितेश राणे म्हणाले मुंबई ‘राम भरोसे’, शिवसेनेला टोला

नाशिकच्या हवेमध्ये वाढलेला गारवा स्थानिकांसाठी समाधानकारक ठरला आहे. विशेषत: नियमीत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांना ही थंडी अनुभवता येत आहे. तापमानामध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे नाशिककरांमध्ये एक प्रकारचा आनंद पाहायला मिळतो आहे. पुणे शहरातील नागरिकांनाही गेल्या २-३ दिवसांपासून हवेत थंडावा जाणवू लागला आहे. आता मुंबईमध्ये ही थंडीची ही लाट कधी येणार? याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलं आहे. ऊन आणि घाम यामुळे हैराण झालेले मुंबईकर थंडीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे राज्यभरात पसरू लागलेली थंडी मुंबईकरांना कधी सुखावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -