घरमहाराष्ट्रमोहन भागवत यांना कोर्टाने बजावली नोटीस

मोहन भागवत यांना कोर्टाने बजावली नोटीस

Subscribe

स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालावी, या मागणीसाठी नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टाने या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीस बजावली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका मोहनिस जबलपुरे यांनी नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली आहे. अतिरिक्त न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने या प्रकरणी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीस बजावली आहे. पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांतही केलेली तक्रार

सरसंघचालक मोहन भागवत आणि अनिल भोकरे यांनी स्वयंसेवकांना लाठी घेऊन पथसंचलनात सामील होण्याचे निर्देश दिले. मात्र, हा प्रकार म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडूनही माहिती मागवली होती. पोलिसांनी पथसंचलनाला परवानगी देताना काही अटी ठेवल्या होत्या. यात पथसंचलनात लाठीचे प्रदर्शन करु नये किंवा बाळगू नये. तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असे यात म्हटल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली होती. पुरावे म्हणून छायाचित्रही दिले होते. मात्र पोलिसांनी संघाशी संबंधितांवर कारवाई केली नाही, असे जबलपुरे यांनी या याचिकेत म्हटले होते.

- Advertisement -

कनिष्ठ न्यायालयाने फेटाळली याचिका

यापूर्वी जबलपुरे यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. शेवटी या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर न्यायालयाने सरसंघचालकांना नोटीस बजावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -