घरताज्या घडामोडीपार्किंगच्या जागेत भिंत बांधून दहा श्वानांना कोंडले, तीन पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

पार्किंगच्या जागेत भिंत बांधून दहा श्वानांना कोंडले, तीन पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

सोसायटीच्या पार्किंगच्या जागेत भिंत बांधून दहा श्वानांना कोंडून ठेवून क्रुर वागणुक दिल्याप्रकरणी एका हाऊसिंग सोसायटीच्या तीन पदाधिकार्‍यांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रविण पाटील, राजेश गांधी आणि सोनाली शहा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अ‍ॅक्वेरिया ग्रँड सोसायटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आहेत. पूर्णिमा सदाशिव शेट्टी या तक्रारदार महिला बोरिवली परिसरात राहत असून त्या सौदी एअरलाईन्समध्ये नोकरी करीत होत्या. 2018 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. पूर्णिमा या प्राणीमित्र असून त्यांच्या राहत्या घरी बारा श्वान तर दोन मांजरी आहेत. रात्री साडेदहा ते पहाटे तीन वाजेपर्यंंत त्या बोरिवलीतील एलआयसी कॉलनी, आयसी कॉलनी, देवीदास लेन परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक श्वानांना जेवण देण्याचे काम करतात.

रविवारी दुपारी एक वाजता त्या चर्चगेट येथे गेल्या होत्या. रात्री साडेदहा वाजता त्या घरी आल्या. त्यामुळे रविवारी रात्री बाहेर न जाता सोमवारी पहाटे चार वाजता श्वानांना जेवण देण्यासाठी बाहेर आल्या होत्या. यावेळी देवीदास लेन, अ‍ॅक्वेरियला ग्रँड इमारत परिसरात त्यांना श्वान दिसून आले नाही. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले होते. सर्वत्र पाहणी केल्यानंतर त्यांना पार्किंगच्या मोकळ्या जागेत एक भिंत बांधण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना आतमध्ये आणखीन एक भिंत दिसून आली. या भिंतीतून काही श्वानांना आवाज येत होता. त्यांनी या श्वानांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मोबाईल घरी असल्याने त्या मोबाईल घेण्यासाठी घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना कॉल करुन घटनास्थळी बोलाविले होते. काही वेळानंतर तिथे शीतल अशोक म्हात्रे आणि लता राजेंद्र कुलकर्णी आल्या. घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी ती भिंत तोडली असता आतमध्ये दहा श्वान इलेक्ट्रीक वायरमध्ये बसल्याचे दिसून आले.

- Advertisement -

या सर्व श्वानांना नंतर त्यांनी बाहेर काढले. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. या माहितीनंतर एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रविण पाटील, सेक्रेटरी राजेश गांधी, सोनाली शहा यांची चौकशी केली होती. या चौकशीत त्यांनीच पार्किंगच्या बाजूला एक भिंत उभी करुन त्यात जागा नसताना दहा श्वानांना कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांच्या फिरण्यावर बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे पूर्णिमा शेट्टी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रविण पाटील, राजेश गांधी आणि सोनाली शहा यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रुरपणे वागणुक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


हेही वाचा : मुंबईत भिंतीच्या बांधकामासाठी झाडांच्या मुळावर घाव, कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -